if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कर्जत तालुक्यातील अनेकांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कोणीतरी म्हणालं घटक पक्षाला उमेदवारी मागायला ” लाज ” वाटली पाहिजे , पण लोकशाहीमध्ये घटक पक्ष असो , किंवा एखादा मतदार असु द्या , त्याला लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार असतो. आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर एक चा पक्ष आहे , आणि या पक्षामध्ये १५ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या मतदार संघामध्ये होता आणि खरा अधिकार कोणाचा असेल तर तो आमचा अधिकार आहे , असे वक्तव्य करून सुधाकर भाऊ घारे यांनी पुन्हा एकदा कर्जत खालापूरच्या जागेवर आपला दावा केला आहे. जर आमच्या नेत्यांवर कुणी चिखल फेक केली , तर त्यांना ” जशास तसे उत्तर ” दिले जाईल , असा इशारा देखील त्यांनी दिला.
ते कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालय येथे रविवारी दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुधाकर भाऊ घारे यांनी पक्षातील कार्यकर्ते आणि नवीन पक्षप्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला , त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की , निवडणुकीला खऱ्या अर्थाने आपण सामोरे कधी जातोय, ही सर्वांची इच्छा आहे. ती आपली सर्वांची इच्छा लवकरच पूर्ण होईल , असं मी आपल्याला या प्रसंगी सांगणार आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने कर्जत खालापुरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, कर्जत खालापूर मधील अन्याय अत्याचार असेल, हुकुमशाही असेल, दादागिरी असेल, हे सर्व नष्ट करण्यासाठी या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचं आहे, असेही सुधाकर भाऊ घारे म्हणाले.
यावेळी राजिप मा . उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या समवेत, प्रदेश सरचिटणीस अशोक शेठ भोपतराव , प्रदेश सचिव भरत भाई भगत , कर्जत तालुका अध्यक्ष भगवान शेठ चंचे, रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक श्रीखंडे , काँग्रेस तालुका महिला अध्यक्ष रंजना धुळे, कर्जत तालुका युवक अध्यक्ष स्वप्निल पालकर तसेच पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सुधाकर घारे युवा मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कर्जत खालापूर मतदारसंघातील विविध गाव पाड्यातील कार्यकर्त्यांनी सुधाकर भाऊ घारे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. उमरोली ग्रामपंचायत मधील डिकसळ , आशाने वाडी, खांडस ग्रामपंचायत मधील चाफेवाडी, भालिवडी ग्रामपंचायतमधील जांभूळवाडी, वंजारवाडी, पुलाचीवाडी, वारे ग्रामपंचायत मधील विकास वाडी, करकुलवाडी आणि खैरपाडा वाडी तसेच शेलू ग्रामपंचायत मधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
खालापूर तालुक्यात १२०० कार्यकर्ते पक्ष प्रवेश सोहळा दुपारी तर संध्याकाळी कर्जत तालुक्यात देखील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने रविवार हा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला.