Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रयत्नाने " स्वातंत्र्याच्या " नंतर पहिल्यांदाच "...

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रयत्नाने ” स्वातंत्र्याच्या ” नंतर पहिल्यांदाच ” गौरवास्पद ” कार्य..

” जुम्मापट्टी ते किरवली ” आदिवासी वाडी मार्ग होणार तयार !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) स्वातंत्र्य काळानंतर माथेरान खालील परिसर असलेला जुम्मा पट्टी हा भाग शासनाच्या नियमात अडकून अनेक सोई सुविधांपासून वंचित होता . आपण या मतदार संघाचे कर्ता करविता असल्याने या आदिवासी बांधवांसाठी दळण वळणाचा मार्ग मोकळा करून दिल्यास भविष्यात त्यांची आर्थिक , आरोग्य , व शैक्षणिक उन्नत्ती होईल , या उद्दात् हेतूने कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून जुम्मापट्टी ते किरवली हा रस्ता मंजूर झाला असून येथील १४ आदिवासी व धनगर वाड्यांचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली निघाला असून माझ्या मतदार संघात केलेल्या या कार्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे , असे मत कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी व्यक्त केले आहे.

कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून स्वातंत्र काळापासून प्रलंबित असलेला ” जुमापट्टी ते कीरवली ” आदिवासी वाडी पर्यंतचा रस्ता तयार होणार असून यामुळे १४ आदिवासी व धनगर वाड्यांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे . हा रस्ता १२ किलोमीटरचा असून या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १८ कोटी रुपयांची मंजुरी मान. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिली होती आणि आज त्या कामाची कार्यारंभ आदेश प्राप्त झाला आहे . स्वातंत्र्य काळापासून हा रस्ता प्रलंबित होता आणि खऱ्या अर्थाने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मेहनतीने व प्रयत्नाने आज कर्जत तालुक्यातील हा ” ऐतिहासिक रस्ता ” मार्गी लागत आहे , आणि या रस्त्यामुळे खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केले आहे . त्यांच्या या कार्यामुळे सर्व आदिवासी संघटनाकडून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे कौतुक केले असून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

आज पर्यंत अनेक आमदार , जिल्हा परिषद अध्यक्ष , सदस्य , पंचायत समिती सदस्य झाले , पण असे गौरवास्पद कार्य कुणी केले नव्हते , ते कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी करून दाखवले , असे गौरोदगार मा. सभापती अमर मिसाळ यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page