Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी उभारली उल्हास नदीच्या तीरावर पंढरी..

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी उभारली उल्हास नदीच्या तीरावर पंढरी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” श्री विठ्ठलाच्या पायी कर्जत , झाले भाग्यवंत , पहाताच होती दंग , आज सर्व संत ” , असे श्री विठ्ठलाचे साक्षात दर्शन घेवून वारकरी यांनी म्हटल तर वावगे ठरणार नाही . श्री विठ्ठलाच्या मुळेच महाराष्ट्राची भूमी ही ” संतांची भूमी ” म्हणून ओळखली जाते . वारकरी संप्रदायाची पायारूपी मुहूर्तमेढ रोवणारे ज्ञानोबा माऊली , तर संत नामदेवांच्या अभंगाने ज्ञान रुपी भिंती बांधून , त्यावर कळस रुपी अज्ञानाचा अंधकार दूर करणारे संत तुकाराम महाराज , यांचा महिमा शतकोन शतको आज ही या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत रुजलेले आपण पहात आहोत.
रायगड च्या ” छत्रपतींच्या ” पावन भूमीत कर्जत तालुक्यात सर्व समाजात भक्तीरूपाने – मैत्री – करुणा – अभंग रुपी गोड वातावरण ठेवून सर्वांनीच सुखाने रहावे , हाच संदेश सर्वत्र देणारे कर्जत खालापूर मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचे वारकरी संप्रदायाच्या प्रती असलेले प्रेम व त्यातून उल्हास नदीच्या तीरावर श्री हरि विठ्ठलाची जीती जागती मूर्ती पाहून प्रत्यक्षात पंढरीच अवतरलेली पाहून भाविक मंत्रमुग्ध होऊन जात असून ” धन्य ते आमदार महेंद्र शेठ थोरवे ” असेच उद्गार सारेजण काढत असल्याचे चित्र कर्जतमध्ये दिसत आहे.

पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास घालू पहाणारे व त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी कर्जत तालुक्याचे ” नंदनवन ” करण्याचे हेतूने नवनवीन उपक्रम राबवून पर्यटकां बरोबरच धार्मिक – सांस्कृतिक नगरी म्हणून कर्जत तालुक्याची ओळख छत्रपतींच्या भूमीत त्यांच्या या स्वप्नामध्ये दिसून येत आहे . वारकरी संप्रदायाच्या मुशीत वाढलेल्या आपल्या आई वडिलांचे व वारकरी बांधवांचे स्वप्न ते आपले स्वप्न मानून कर्जतमध्ये उल्हास नदीच्या तीरावर श्री हरी ची मूर्ती स्थापन करून त्यांनी ” न भूतो , न भविष्यती ” असे अप्रतिम कार्य केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते या विलोभनीय श्री विठ्ठलाच्या साक्षात मूर्तीचे लोकार्पण सोहळा होणार असून याचे साक्षीदार होण्यासाठी रायगडातून तमाम वारकरी संप्रदाय व नागरिकांची अलोट गर्दी या कार्यक्रमास होणार असून, तो क्षण कधी येणार , याची वाट सर्वच जण उत्सुकतेने पहात आहेत .मात्र या निमित्ताने सर्वच जण म्हणत आहेत ” उल्हास नदीच्या तीरी , उभा मंदिरी तो पहा विटेवरी , विठ्ठल विठ्ठल जय हरी – जय विठ्ठल विठ्ठल जय हरी ” !
- Advertisment -

You cannot copy content of this page