भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली अनेक वर्षे रहात असलेल्या कर्जत नगरपरिषद हद्दीतील इंदिरानगर प्रभागामधील रहिवाशांनी आपल्या घरांचे बांधकाम नियमानुकुल करण्यासंबंधी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी वाटचाल सुरू केली असून त्यासंबंधी श्री. सुधीर मुनगंटीवार – वनमंत्री आणि वन विभागाचे सर्व अधिकारी समवेत मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यासंबंधी नुकतीच चर्चा करण्यात आली.त्यामुळे येथील रहिवाशांची घरे वन जमिनीवर असल्याने लवकरच या बाबीची चर्चा होऊन हा तिढा आमदार महेंद्रशेठ थोरवे सोडविणार ,यावर आता शिक्कामोर्तब होणार , असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.
कर्जत नगर परिषद हद्दीतील इंदिरानगर येथील १५७ घरांची वस्ती ही वन विभागाच्या अंतर्गत असलेल्या वन जमिनीवर आहे . त्यामुळे या जमिनीवरून आम्हाला उठवतात की काय ? अशी टांगती तलवार येथील रहिवाशांच्या डोक्यावर असल्याने नेहमीच तणावग्रस्त परिस्थितीत येथील रहिवाशी असत , मात्र ही बाब येथील कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडे गेल्यावर तुम्हाला न्याय नक्कीच मिळवून देईन , असे आश्वासन त्यांनी येथील नागरिकांना दिले होते.
त्याच आश्वासनाची पूर्तता करण्यासंबंधी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, वन मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घेऊन आज मंत्रालयात सकारात्मक चर्चा झाली असुन दिवाळी नंतर आढावा बैठक आयोजित करण्याच्या सुचना वन मंत्री यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या आहेत.त्यामुळे येथील रहिवाशी वर्गास लवकरच हा तिढा सुटून दिलासा मिळेल , अशी खात्री आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी केलेल्या चर्चेनुसार दिसून येत आहे.