Thursday, July 3, 2025
Homeपुणेमावळआशा सेविका खऱ्या कोरोना योद्धा - आमदार सुनील शेळके..

आशा सेविका खऱ्या कोरोना योद्धा – आमदार सुनील शेळके..

मावळ दि.19: पुणे जिल्हा परिषद , पंचायत समिती मावळ आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयोजित मावळ तालुकास्तरीय ‘आशा दिवस ‘ या कार्यक्रमात गुणवंत आशा सेविकांचा आमदार शेळके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच सेव दि चिल्ड्रेन व सेवाधाम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आशा स्वयंसेविका जनजागृती शिबिर घेण्यात आले .

महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे मनोबल खचत असताना जीवाची पर्वा न करता आशा स्वयंसेविकांनी कोरोना प्रतिबंधासाठी गावपातळीवर केलेले कार्य कौतुकास्पदच आहे.ग्रामीण भागात लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे . ग्रामीण भागात जबाबदारीने कर्तव्य निभावणाऱ्या सर्व आशा ताई खऱ्या कोरोना योद्धा असल्याचे गौरवोद्गार मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी काढले.

तसेच या काळात माणूस माणसा पासून दूर गेला होता . आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना सारख्या महामारीच्या संकटातही आशा स्वयंसेविका अखंडपणे राबत होत्या . ग्रामीण भागातील ज्येष्ठांसह , मुले , महिला सर्वांनाच आरोग्य सुविधा मिळवून देण्यात आशाताईंची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे . ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीबाबत अनेक गैरसमज होते . सुरुवातीला नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यावेळी आशा स्वयंसेविकांनी गावागावात जाऊन नागरिकांचे प्रबोधन करत ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. सर्वांचे लसीकरण झाल्यानेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे .

याचे श्रेय आशा स्वयंसेविकांना जाते . यापुढील काळात देखील समाजप्रबोधनासह तुमची सेवेची वृत्ती अधिक दृढ होवो या सदिच्छा दिल्या,ग्रामीण भागात जबाबदारीने कर्तव्य निभावणाऱ्या सर्व आशाताई खऱ्या कोरोना योद्धा आहेत . त्यांच्या कार्याचा गौरव एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्यांचा नेहमीच आदर केला गेला पाहिजे, असेही आमदार शेळके म्हणाले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे , सेव दि चिल्ड्रेन संस्थेच्या एमडी अपर्णा जोशी , वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे , अशोक दडस , गोविंद हजारे , सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र , लसीकरण केंद्र , कर्मचारी आणि सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page