Saturday, November 23, 2024
Homeपुणेइंदापूर पोलिसांची गुटखा माफियांवर नजर कायम,30 लाखाचा अवैध गुटखा हस्तगत...

इंदापूर पोलिसांची गुटखा माफियांवर नजर कायम,30 लाखाचा अवैध गुटखा हस्तगत…

इंदापूर दि.18 : इंदापूर पोलीस गुटखा माफियांवर आक्रमक आज पहाटेच्या दरम्यान इंदापूर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करून तब्बल 30 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास सोलापूरकडून पुणेच्या दिशेने आयशर टेम्पो क्रमांक KA -01 AL – 9121 जात असताना इंदापूर पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी संशयित आयशर टेम्पोची तपासणी केली असता त्यात अवैधरित्या मानवी जीवनात अपायकारक ठरणाऱ्या व शासनाने बंदी घातलेला आर.के.कंपनीचा गुटखा आढळून आला .

यामध्ये इंदापूर पोलिसांनी गाडी ड्रायव्हर व मालकाविरुद्ध भारतीय कलम 328 प्रमाणे व इतर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . इंदापूर पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई असून इंदापूर पोलीस निरीक्षक टी . वाय . मुजावर यांच्या नेतृत्वाखाली अवैद्य गुटख्यावर तीन ते चार महिन्यात ही चौथी मोठी कारवाई आहे.

सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने , सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील,पोलीस उपनिरीक्षक लिगाडे , पोलीस उपनिरीक्षक पाडूळे , पोलीस नाईक सलमान खान , पोलीस नाईक मोहम्मद अली मडी , पोलीस नाईक मोहोळे , पोलीस नाईक मोहिते , पोलीस कॉन्स्टेबल काळे , पोलीस कॉन्स्टेबल राखुंडे , महिला पोलीस हवालदार खंडागळे , महादेव गोरवे यांनी ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page