Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांचा करिष्मा कायम "…

” उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांचा करिष्मा कायम “…

चिमटेवाडी व मोरेवाडी येथील दीडशेहून अधिक आदिवासी बांधवांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील टोकाची व सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कळंब आणि पाथरज परिसरातील चिमटेवाडी व मोरेवाडी येथील जवळपास १५० हून अधिक आदिवासी बांधवांनी उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या कार्यावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात १६ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर प्रवेश केला . हा पक्ष प्रवेश कार्यक्रम कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती ” शिवालय ” कार्यालयात पार पडला.

या पक्ष प्रवेशासाठी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत, तालुका संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर, विधानसभा अधिकारी अ‍ॅड.संपत हडप, माजी जिल्हा संघटिका रेखाताई ठाकरे, महिला संघटिका करुणा बडेकर, माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके, उपतालुका प्रमुख बाजीराव दळवी, उपशहरप्रमुख कृष्णा जाधव, आदिवासी संघटना प्रमुख मालू निरगुडा, ग्राहक संरक्षण तालुका चिटणीस प्रदीप देशमुख, कळंब जिल्हापरिषद विभागप्रमुख लक्ष्मण पोसाटे, जिल्हापरिषद संघटक रमेश भुसाळ, पाथरज जिल्हापरिषद संघटक संतोष घाडगे, पाथरज पंचायत समिती विभाग प्रमुख भगवान बांगर, कळंब पंचायत समिती विभागप्रमुख किशोर पोसाटे, कॉलेज कक्ष सक्रिय सदस्य धर्मेश परमार, गटप्रमुख नानु शिंगोळे, गजानन जाधव, रामदास ठोंबरे प्रमुखांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी त्याचबरोबर शिवसेना अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होता.

कळंब जिल्हापरिषद हद्दीतील ग्रुप ग्रामपंचायत नांदगाव येथील मौजे चिमटेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ चिमटे, गुरुनाथ चिमटे, मच्छिंद्र चिमटे, सुजाता चिमटे, जयश्री कारोटे, सुधाबाई चिमटे, इंदूबाई चिमटे, मंगल चिमटे, पद्मा चिमटे, योगिता चिमटे, हिराबाई ठोंबरे, कविता ठोंबरे तसेच पाथरज जिल्हापरिषद विभागातील ग्रुप ग्रामपंचायत पाथरज मधील मौजे मोरेवाडी येथील रमेश पादिर, हरीचंद्र निरगुडा, सुरेश पादिर, गौतम पादिर, हनुमंत दरवडा, महादू दरवडा, शिवराम पादिर, गणपत निरगुडा, महेश केवारी, रोशन केवारी, आंबीबाई पादिर, शांताबाई पादिर, हिराबाई पादिर, शारदा पादिर, मंगल लोभी, लता पादिर, सरिता दरवडा, नर्मदा दरवडा, रेवती निरगुडा, मणिबाई निरगुडा, यमुना निरगुडा, मंजुळा केवारी, गीता पादिर, मंदा पादिर, होसाबाई दरवडा, शांताबाई पादिर, कुसुम पादिर, प्रतिभा वारे, मनीषा वारे, प्रमिला वारे, शारदा वारे, पूनम दरवडा, सुरेखा दरवडा, छाया निरगुडा, दीपा केवारी, हिरा केवारी, बुधी निरगुडा, यशी पादिर, बेबी दरवडा आदी प्रमुखासह दोन्ही आदिवासी वाडीतील साधारणपणे दीडशेहून अधिक आदिवासी समाज बांधवांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला.

तर या पक्ष प्रवेशाने कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस शिवसेना पक्षाची पक्ष बांधणी मजबूत होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे , तर सर्व आदिवासी समाज बांधवांचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी शिवसेना पक्षात स्वागत करीत पुढील काळात आपल्याला पक्षाच्या वतीने ताकद देत आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू , तसेच आपल्या कोणत्याही समस्या असल्यास त्या आमच्या समोर मांडाव्यात, जेणेकरून त्या समस्या तत्पर सोडवण्यात येतील असे आश्वासन उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी दिले.
- Advertisment -

You cannot copy content of this page