लोणावळा : लोणावळा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि ही खूप चिंता जनक बाब आहे. त्यासाठी लोणावळा शहरातील पुढाऱ्यांनी व नेते मंडळींनी कोरोनाचे राजकारण करू नये. किंबहुना शहरातील कोरोनाची साखळी कशी तोडता येईल याचा एकत्रित विचार करावा.
दोन दिवसापूर्वी संजीवनी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णास दोन रेमडिसिवीर इंजेक्शनची गरज असताना एक इंजेक्शन संजीवनी हॉस्पिटल कडे उपलब्ध झाले आणि दुसरे इंजेक्शन उपलब्ध नसून ते तुम्ही आणून दया असे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांकडून आमदार सुनील शेळके यांना फोन करून विचारणा केली असता हॉस्पिटलला इंजेक्शन मिळाली आहेत आणि हॉस्पिटल इंजेक्शन नाही असे सांगत आहे हे पाहता हॉस्पिटल कर्मचारी व सुनील अण्णा शेळके समर्थकांमध्ये किरकोळ वादावाद झाली.
याचा आढावा घेण्यासाठी आमदार स्वतः संजीवनी हॉस्पिटल येथे आले किरकोळ वादावादीचे कारण लक्षात येता आमदार शेळके यांनी हॉस्पिटल कर्मचारी आणि मेडिकल यांना विचारले असता इंजेक्शन किती रुग्णांना दिली आहेत याच्यात गोंधळ झाला होता. रुग्णांचे नातेवाईक यांना मेडिकल व हॉस्पिटल कडून चुकीची माहिती मिळाल्यामुळे तेथील वातावरण तापले व हा वादिवाद झाला.
आमदार सुनील शेळके हे मावळातील आमदार असल्यामुळे ते नेहमीच सर्वांच्या मदतीस धावून येतात आणि हा त्यांच्यातील समाजसेवेचा गुणधर्मच आहे.आमदार शेळके हे संजीवनी हॉस्पिटल येथे आले तेथील सर्व घटनेचा आढावा घेतला आणि दुसऱ्या दिवशी आमदार शेळके यांची संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्यामध्ये चर्चा झाली असता हॉस्पिटल मध्ये झालेला वाद हा काही गैरसमजामुळे झाला असल्याचे समजले.
असे गैरसमज होऊ नये,मिळालेली रेमडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध असल्यास सर्व रुग्णांना मिळावी आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना त्या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी ताकीद आमदार शेळके यांनी दिली.त्यावेळी पुढील काळात रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणार असे आश्वासन संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले.सर्व प्रकार घडत असताना मात्र आमदारांची दबंगगीरी, व स्टंटबाजी अशी टीका करण्यात आली.
आमदार शेळके इतरांच्या मदतीला धावून येतात तसे सर्व राजकारण्यांनी शहरातील नागरिकांच्या मदतीस पुढाकार घेत सध्या नागरिकांना गरजेचे काय आहे याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे. राजकारण करण्यासाठी आणखी वेळ मिळेल परंतु समाजकारण करण्याची हीच खरी वेळ आहे. त्यासाठी एकमेकांकडे बोट दाखविणे थांबवून शहरातील कोरोना रुग्णांना सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करावा.
शहरातील वाढत्या रुग्ण संख्येच्या प्रमाणे आपल्या शहरात असणारे प्रशासकीय कोविड सेंटर हे फारसे नाही. आणि कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची सुविधा देणारे एकमेव हॉस्पिटल संजीवनी आहे.रुग्णांच्या नातेवाईकांस संजीवनीमधील महागडे बिल भरणे सध्याच्या परिस्थितीत अवघड होत आहे. शहरात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची सुविधा असणारे एकमेव हॉस्पिटल आहे ही खूप दुर्दैवी बाब आहे.
अशाच काही खाजगी रुग्णालयात रुग्णांकडून कोरोनाच्या नावाखाली , रेमडिसिवीर इंजेकशनच्या नावाखाली जास्तीचे रुपये उकळून लूटमार सुरु आहे.सध्या असलेले कोरोनाचे संकट गंभीर असताना ही लढाई जिंकायची असेल तर समाजाला खरी गरज आहे ती प्रामाणिक डॉक्टर्स व कोविड सेंटरची शहरात प्रशासकीय एकच कोविड सेंटर असून संजीवनी सारख्या आणखी खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर ची सोय करण्यात आली तर याचा नक्कीच लोणावळेकरांना फायदाच होईल.
कोरोनातुन रुग्ण वाचावा म्हणून रुग्णाचे नातेवाईक खूप प्रयत्न करतात. परंतु अपुऱ्या पडणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून नातेवाईकांना फारसे सहकार्य होत नाही. डॉक्टर, कर्मचारीही असभ्य वर्तन करत असतात आणि रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून नपरवडणारे बिल आकारले जात आहे.जर संपूर्ण शहरात कोविड उपचारासाठी एकच खाजगी रुग्णालय असेल तर तिथे रुग्णांकडून जास्त बिल आकरणे साहजिकच आहे.
त्यासाठी प्रशासनाने व नेते मंडळींनी एक मेकांवरील चिखलफेक करण्याऐवजी शहरातील नागरिकांच्या मुख्य गरजेकडे लक्ष देने शहराच्या हिताचे होईल.त्याने वैद्यकीय सेवेतून होणारा काळाबाजारही थांबेल, रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी येणे बंद होईल, आणि जे पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशन मध्ये ठेवले जातात त्या सर्व रुग्णांना हॉस्पिटलमधेच आयसोलेशनची सोय होईल असे झाल्यास रुग्ण बाहेर फिरणार नाहीत, त्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होणार नाही आणि शहरातील रुग्ण संख्येत मोठया प्रमाणात घट होईल. त्याअनुषंगाने शहर कोरोनामुक्त होण्यास खूप मदत होईल.