Friday, October 18, 2024
Homeपुणेमावळएकलव्य फौंडेशन संस्थेला "भारत गौरव पुरस्कार" प्रदान…

एकलव्य फौंडेशन संस्थेला “भारत गौरव पुरस्कार” प्रदान…

मावळ : SwiftnLift संस्था पुणे यांच्या मार्फत एकलव्य फौंडेशन या संस्थेस “भारत उद्योग गौरव ” पुरस्कार २०२४ प्रदान करून गौरविण्यात आले.
एकलव्य फौंडेशन हे बेरोजगार तरुणांसाठी त्यांचा हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी कायम धरपडत असते त्यासाठी महाराष्ट्रभर भव्य रोजगार मेळावे असतील, किंवा गरीब जनतेसाठी मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कार्य असेल आणि ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी असंख्य गृहोद्योगाचे प्रशिक्षण एकलव्य फौंडेशन मार्फत दिले जाते. म्हणजे एकलव्य फौंडेशन मार्फत बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण महाराष्ट्रभर मोलाचे योगदान दिले जाते.
सन 2017 पासून जनमानसात वेगळी ओळख निर्माण करून वंचित असलेल्या जनतेला योग्य मोबदला देण्याचे कार्य एकलव्य फौंडेशन करत आहे. या सर्व अनगीनत समाजसेवी कार्याचा आढावा घेऊन एकलव्य फौंडेशन या संस्थेला यंदाचा भारत उद्योग गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते एकलव्य फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रविण देशमुख आणि त्यांचे सहकारी ओमकार पवार, विकास धोत्रे, अविनाश देसाई, सुनिल पवार, गणेश इंगवले, आदित्य नीलकंठ यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रविण देशमुख यांनी ” समाजातील प्रत्येक घटकाला आमच्या एकलव्य फौंडेशन परिवाराकडून शासकीय लाभार्थी बनवू आणि महाराष्ट्रातील बेरोजगारी नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहू ” असे मनोगत व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page