लोणावळा : रेल्वे अधिकारी ( महाप्रबंधक ) लोणावळा यांना प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.
लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देणेबाबत , तसेच कर्जत – पुणे डेमो शेटल सेवा सुरू करणेबाबत, रेल्वे उडानपुलाचे काम नांगरगांव – भांगरवारी सुरु करणे बाबत . यासारख्या मागण्या पूर्ण करण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने देण्यात आले.
लोणावळा हे मुंबई मार्गावरील अत्यंत लोकप्रिय आणि सतत पर्यटकांनी गजबजलेले निसर्गरम्य स्थळ असून पुणे मुंबई रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक , अनेक परप्रांतीय नागरीक , कामगार व त्यांचे कुटुंबीय लोणावळा शहरामध्ये व ग्रामिण परिसरात स्थायिक झाले आहेत . गुजरात , राजस्थान , मध्यप्रदेश , बिहार , उत्तर प्रदेश आदि ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना लोणावळा येथे अधिकृत हॉल्ट न देता तो टेक्नीकल हॉल्ट देण्यात आला होता .तसेच लोणावळा आणि परिसरातील परप्रांतिय शेकडो प्रवासी पुणे पासुन तिकीट काढून लोणावळा येथे गाडी पकडत होते . परंतु लोणावळा येथील टेक्नीकल हॉल्ट रद्द करून तो खंडाळा येथे नेण्यात आला आहे. खंडाळा हे रेल्वे स्टेशन गावापासुन तसेच आसपासच्या ग्रामिण परिसरापासुन खुपच लांब आहे . ह्या मुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास हा प्रवाशांसाठी खुपच गैरसोयीचा आणि त्रासदायक झालेला आहे . बायका , मुले , वृद्ध तसेच दिव्यांग व्यक्ती आणि सामानसुमान घेऊन पुणे – मुंबई महामार्गावरून खंडाळा स्टेशन पर्यंत पोहचणे खुपच त्रासदायक आणि खर्चिक आहे.
लोणावळा ते खंडाळा महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडीमुळे खंडाळा येथे पोहचे पर्यंत गाडी सुटण्याचाही धोका असतो, आणि कृपया लोकल फेऱ्या पुर्ववत करून दैनंदिन प्रवाशांना दिलासा द्यावा . लोणावळा येथुन कोटा – सवाईमाधोपुर – जयपुर कडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे . पुणे जयपुर एक्सप्रेस ही लांब पल्ल्याची गाडी आठवड्यातुन दोन दिवस असल्यामुळे या भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे . तरी सदरची पुणे जयपुर एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवून त्या दररोज कराव्यात ही विनंती व कर्जत – पुणे डेमो शेटल सेवा सुरू करावी व सर्व प्रवाशांना दिलासा द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, कार्याध्यक्ष रवि पोटफोडे, युवक अध्यक्ष विनोद होगले, स्वप्नील पाळेकर, अजिंक्य कुटे, जयेश देसाई यांसमवेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.