Thursday, January 9, 2025
Homeपुणेलोणावळाएमबीए-सीईटी २०२५ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सिंहगड सिबाका महाविद्यालयात मोफत सुविधा उपलब्ध

एमबीए-सीईटी २०२५ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सिंहगड सिबाका महाविद्यालयात मोफत सुविधा उपलब्ध

लोणावळा : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी एमबीए/एमएमएस पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमबीए-सीईटी (MAH-MBA/MMS CET) २०२५ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार, २५ डिसेंबर २०२४ पासून सुरू झाली असून ती शनिवार, २५ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. ही माहिती सिंहगड संस्थेच्या सिबाका (एमबीए) महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. विद्या नखाते यांनी दिली.
लोणावळा येथील सिंहगड सिबाका महाविद्यालयात या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ. नखाते यांनी सांगितले की, एमबीए-सीईटी २०२५ ही पदवीनंतर एमबीए अभ्यासक्रमासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा १, २ आणि ३, एप्रिल २०२५ रोजी आयोजित केली जाईल.
विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरावा, तसेच कोणत्याही अडचणीसाठी सिंहगड सिबाका महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सतीश कांबळे यांनी केले आहे. संपर्कासाठी खालील क्रमांक दिले आहेत :
०२११४-६७३३०६/३०८/५०२/५०८ /९८८१४७६७१४ / ९९६०२४९४००,( सिंहगड संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.)
- Advertisment -

You cannot copy content of this page