भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) नेहमीच कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या मदतीला व समस्या दूर करण्यास अग्रेसर असणारे भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांच्या प्रयत्नाने स्वस्त दरात श्रवण वाटपांचा कार्यक्रम नुकताच दि .१७ जुलै २०२२ रोजी त्यांच्या संपर्क कार्यालय – विठ्ठलनगर कर्जत येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यांत गरजू नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून कानाची तपासणी केली व श्रवण यंत्र घेतले.यावेळी भारतीय जनता पार्टी कर्जत विधानसभा क्षेत्र , युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.याप्रसंगी मुंबई महानगर पालिकेचे नगरसेवक निल सोमय्या हे उपस्थित राहून या अल्प दरात श्रवण यंत्र उपक्रमात सहभागी झाले.
तर त्यांचे या कार्यक्रमात खूपच सहकार्य मिळाले.रास्त दरात श्रवण यंत्र वाटप शिबिरात याप्रसंगी ६४ नागरिकांना पाचशे रुपयांमध्ये यंत्र देण्यात आली. इतर अनेक रुग्णांची तपासणी करून पुढील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी सांगण्यात आले. या शिबिरास कर्जत मधील गरजू नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करून आम्हाला अत्यल्प दरात श्रवण यंत्र मिळाल्या बाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मुबंई महापालिकेचे नगरसेवक निल सोमय्याजी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी ” ऐका स्वाभिमानाने ” या मोहिमे अंतर्गत होणाऱ्या या उपक्रमबाबत माहिती दिली.
ही श्रवण यंत्रे साधारणपणे बाजारात ९ ते १० हजाराला विकत मिळतात परंतु युवक प्रतिष्ठान – मुंबई यांनी हि मशिन्स परदेशातून खास गरीब – गरजू नागरिकांना वाटप करण्यासाठी बनवून घेतली आहेत , असे सांगितले. ह्या यंत्राचे ५०० रुपये का घेतो ? यावर त्यांनी मुद्देसूद सांगितले. ह्याच पैशातून अजुन अनेकांना ऐकू येऊन त्यात तुमचाही ” खारीचा वाटा ” असावा असा या उपक्रमाचे मर्म असल्याचे त्यांनी सांगून यापुढेही कर्जत मध्ये विविध उपक्रम राबाविण्यासाठी मदत करू , असे सांगितले. तसेच सुनील गोगटे आणि त्यांच्या सर्व सहकारी भाजप पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजप कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुनिल गोगटे , जिल्हा उपाध्यक्ष वसंतशेठ भोईर , दिनेश सोळंकी , शहर अध्यक्ष तथा नगरसेवक बळवंत घुमरे ,मिलिंद खंडागळे ,समीर सोहोनी, मारुती जगताप , नितीन कांदळगावकर , सूर्यकांत गुप्ता , प्रमोद पाटील , श्रीनिवास राव , दिनेश गणेगा , राहुल मसणे , सर्वेश गोगटे , हरिश्चंद्र मांडे , विजय कुलकर्णी , सार्थक घरलुटे , अभिनय खांगटे , दर्पण घारे , कल्पना दास्ताने , महिला ता.अध्यक्षा स्नेहा गोगटे , नम्रता कांदळगावकार , अश्विनी अत्रे , सुमीता महर्षी , मानसी खेडेकर , स्वप्ना सोहोनी , भाऊ राठोड , रमेश राठोड असे बहुसंख्य भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी या स्वस्त दरात श्रवण वाटपा उपक्रमाचा व कान तपासणी शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.