if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
खोपोली- दत्तात्रय शेडगे
ऑल इंडिया धनगर समाज युवक आघाडी महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी तुकाराम कोकरे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना ही ऑल इंडिया धनगर समाज महासंघ संघटना असून संपूर्ण महाराष्ट्रात या महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघटना बांधणी चालू आहे.
तुकाराम कोकरे हे गेल्या अनेक वर्षापासून या महासंघाचे काम करीत असून त्यांच्यावर पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती त्या काळात कोकरे यांनी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवर जाऊन संघटनेचे महत्व पटवून देत ऑल इडिया धनगर महासंघ हा प्रत्येक गावात पोहचवून संघटनेची ध्येय धोरणे युवकांना समजावून सांगत संघटना वाढविण्याचे काम केले आहे.
याची दखल महासंघाचे घेत तुकाराम कोकरे यांची ऑल इंडिया धनगर समाज युवक आघाडी महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली, या निवडीने कोकरे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.