![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
गुणवंत विद्यार्थी – डॉक्टर – वकील – अधिकारी यांचा ” भव्य सत्कार सोहळा ” संपन्न , कर्जत तालुका अध्यक्ष ” बी.एच. गायकवाड ” यांची उल्लेखनीय संकल्पना…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात ” दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा ” शाखा कर्जत या बौद्ध धम्मा नुसार धार्मिक कार्य करणाऱ्या संस्थेचे ” कर्जत तालुका अध्यक्ष बी. एच. तथा बबन गायकवाड ” यांच्या पुढाकाराने नेहमीच कर्जत तालुक्यात सामाजीक बांधीलकी, विधायक कार्या निमित्ताने अनेक सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात . त्या माध्यमातून समाजातील भरीव ” यश ” प्राप्त केलेल्या समाज रत्नांना , उत्तेजीत व उत्साह द्विगुणित व्हावा , यासाठी त्यांना ” सन्मानित ” करत असतात . यावेळी तक्षशिला बुद्ध विहार कडाव येथे ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कर्जत यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षणाचे महत्त्व समजून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ” शिक्षित व्हा ” या दिलेल्या संदेशानुसार उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर , वकील , इंजिनिअर व उच्च अधिकारी या गुण रत्नांचा सत्कार समारंभ गुरुवार दिनांक १२ जून २०२५ रोजी सकाळी ११ वा. आयोजित केला होता.
याप्रसंगी या कार्यक्रमास आद. व्हि. एस. मोखळे ( ट्रस्टी तथा राष्ट्रीय महासचिव ) यांच्या शुभहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक सूत्र पठण होवून पूज्य भंते महेंद्रबोधी थेरो यांचे आशीर्वादाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. बी.एच. तथा बबन गायकवाड – कर्जत तालुका अध्यक्ष , प्रमुख अतिथी व्ही . एस. मोखळे – ट्रस्टी व राष्ट्रीय महासचिव , आद. महेंद्र मोरे – महाराष्ट्र अध्यक्ष , आद. काशिनाथ कांबळे – रायगड जिल्हा माजी अध्यक्ष , आद. विशाल ढाले – एस सी ओ मुंबई , आदी मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते , तर प्रमुख उपस्थिती वसंत कांबळे – जिल्हा कोषाध्यक्ष , पी. एस. गायकवाड , रवींद्र गायकवाड , सविता गायकवाड , नंदा गायकवाड , बि.डी. गायकवाड , सुनील गायकवाड – उद्योजक , योगेश आप्पा गायकवाड – संस्थापक अध्यक्ष भीम गर्जना मित्र मंडळ , मधुकर शिंदे , शरद रोकडे – सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्जत , ऍड. तुकाराम ढोले , विश्वनाथ गायकवाड , हरिचंद्र जाधव , गणपत खंडागळे , अलका सोनावणे – आरपीआय महिला कर्जत तालुका अध्यक्षा , ए.डी. जाधव , ऍड. सुमित साबळे – भीम महोत्सव अध्यक्ष कर्जत , ऍड. सुरज पंडित आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सामाजीक बांधीलकी, विधायक कार्या निमित्ताने कर्जत तालुका ग्रामीण वाडी – वस्ती भागांतील शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये इयत्ता १० वी व १२ वी बोर्डात उत्तीर्ण होऊन ” उज्वल यश ” संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा , उच्च शिक्षण घेणारे डॉक्टर , वकील , इंजिनिअर , व उच्च अधिकारी यांचा सत्कार समारंभ कर्जत तालुका धम्म शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता . इयत्ता १० वी मध्ये समता विजय देशपांडे 89% कर्जत बौद्ध नगर , किमया सुनील गायकवाड 81% कोंदिवडे , तेजस्विनी किरण गायकवाड 81% कोंदिवडे , तर ऍड. उषा जनार्दन कांबळे – कर्जत , ऍड. सुरेश सोनावळे – कशेळे , ऍड. दिक्षा वसंत जाधव – वेणगाव , तसेच डॉ. स्वप्निल श्याम रोकडे ( BAMS ) – वदप , डॉ. तेजस आत्माराम खंडागळे ( BAMS ) – कशेळे , डॉ. रोशन रमेश ससाणे ( BAMS ) – नेरळ , उच्च अधिकारी विजय लक्ष्मण गमरे – कस्टम ऑफिसर , अतुल बबन गायकवाड – असिस्टंट मॅनेजर रिलायन्स जिओ कंपनी मुंबई , यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते शाल – पुष्पगुच्छ – सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्हि. एस. मोखळे म्हणाले की , महामानव घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कमी समजू नका , हि एक अफाट शक्ती आहे , ज्या बाबासाहेबांना शाळेतील वर्गाच्या बाहेर बसवलं , ज्यांना गाडीतून हाकलून दिलं , त्या महामानवाने या देशाच संविधान लिहून सर्वांना हजारो अधिकार दिले , हे सांगितले . तर आयु. महेंद्र मोरे – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी गुणवंत विद्यार्थी हेच देशाची नवी पिढी घडवितात , मात्र सध्याच्या स्थितीमध्ये तरुणांना रोजगार मिळत नाही , म्हणून पुढील काळात एक दिवसीय उद्योजकता कार्यक्रम ठेवावा , रोजगार प्रशिक्षण शिबिर हे आजच्या विद्यार्थ्यांना गरजेचे असल्याचे अनमोल मत त्यांनी व्यक्त केले . यावेळी या कार्यक्रमाचे व भारतीय बौद्ध महासभेचे कर्जत तालुका अध्यक्ष बी. एच. तथा बबन गायकवाड यांनी गेली चार वर्षांपासून संस्थेच्या वतीने १० व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुढील यशस्वी कार्यासाठी गरुड भरारी घेण्याकरिता बळ मिळावे , म्हणून सत्कार करत असतो , पण यावेळी समाजाला आदर्श ठरणारे डॉक्टर , वकील , इंजिनिअर , व उच्च अधिकारी यांचा अतिरिक्त सत्कार कार्यक्रम शाखेच्या वतीने यावर्षी राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन एल. एम. भालेराव – महासचिव कर्जत तालुका , व राजेश ढोले – उपाध्यक्ष संस्कार यांनी केले , प्रास्ताविका सूर्यकांत दादा गायकवाड – कोषाध्यक्ष ता. कर्जत , व अशोक शिंदे – विभाग क्र. ७ कोषाध्यक्ष , उदय आढाव , विश्वनाथ गायकवाड , यांनी केले . यावेळी या कार्यक्रमास संजय जाधव , रोशनी शिंदे , मनिषा शिंदे , गौतम गायकवाड , भीमराव गायकवाड , गणेश जाधव , ज्योती गायकवाड , हरिश्चंद्र सोनावळे , संतोष रोकडे , रमेश शिंदे , भीमराव रोकडे , मुकुंद देसाई , अशोक दूधसागर , भगवान पंडित , बापू घोडके , अनंता गायकवाड , रमेश ससाणे , मनिषा जाधव , कुणाल गायकवाड , बाळू देसाई , उमेश शिंदे , सुभाष जाधव , सुनिल सोनावणे , आदी पदाधिकारी उपस्थित होते . या कार्यक्रमास योगेश आप्पा मारुती गायकवाड – कर्जत बौद्ध नगर यांनी भोजन दान केले , तर कवीश्वरी सुनील गायकवाड – कोंदीवडे गुड शेफर्ड व्हाइस प्रिन्सिपॉल , सविता सूर्यकांत गायकवाड – जिल्हा महिला उपाध्यक्षा , नंदा बबन गायकवाड यांनी सन्मान चिन्ह , तर सुजाता संजय जाधव – कर्जत बौद्ध नगर यांच्या वतीने सन्मान पत्राचे सहकार्य लाभले . या कार्यक्रमाचे व्यवस्थापन बौद्ध तरुण मंडळ कडाव , विभाग क्रमांक ७ मधील सर्व कार्यकारिणी यांनी चोख केली होती . आलेल्या सर्व बौद्ध बांधव , महिला भगिनी , तसेच राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , धार्मिक , सांस्कृतिक , या क्षेत्रातील आलेल्या मान्यवरांचे व समाज बांधवांचे आभार भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष व या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. एच. तथा बबन गायकवाड यांनी केले.