if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत उपजिल्हा रुग्णालय हे कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आरोग्य सेवा आहे . त्यामुळे तालुक्यातील व बहुतांश ग्रामीण भागातील रुग्ण येथे उपचार करण्यासाठी येतात.मात्र अपुऱ्या सोई – सुविधांमुळे पर्यायाने त्यांना खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार अथवा इतर सोई नसल्याने बाहेरून सोनोग्राफी सारखे इतर रिपोर्ट आणावे लागतात.पर्यायाने नाहक पैशांचा भुर्दंड पडत असल्याने आदिवासी , गोर गरीब नागरिक , कामगार , यांत भरडले जात असल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात तातडीने सोनोग्राफी , सी.बी.सी. डायलिसिस सेवा तसेच इतर सोई – सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाने केली आहे.
सध्या कोरोना महामारीच्या संकटात सर्व नागरिक असताना कर्जत तालुक्यात पूर्वापार चालत आलेले मधुमेहाचे ( शुगर ) रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत . तर काहींना वेळोवेळी डायलिसिस करावे लागते.अद्यापी हि सेवा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात मंजूर होऊन देखील सुरू झाली नसल्याने रुग्णांना पनवेल , मुंबई येथे जाऊन खाजगी रुग्णालयात मोठी रक्कम देऊन डायलिसिस करून घ्यावे लागते . तर सोनोग्राफी मशीन अभावी बाळंतीण महिला , मुतखडा , किंवा पोटातील काही दुखणे असलेले रुग्ण कर्जत उपजिल्हा रुग्णालयात हि सोनाग्राफीची सुविधा नसल्याने बाहेर खाजगी सेवेत जाऊन भरमसाठ पैसे देऊन तेथून रिपोर्ट आणावे लागतात.
आदिवासी बहुल भाग असलेल्या कर्जत तालुक्यातील मध्यवर्ती शहरातील ठिकाणी या सोई सुविधा नसणे , हे चुकीचे असून अलिबाग जिल्हाशल्य चिकित्सक यांनी या सोई सुविधा तातडीने पुरविणे गरजेचे असून , अन्यथा या आपल्या निष्काळजीपणामुळे गोर गरिबांच्या जीवावर बेतण्याची घटना घडू शकते ,यांस सर्वस्वी शासकीय यंत्रणा जबाबदार असेल , व याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ,असा संतप्त ईशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाने दिला आहे.
यावेळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे यांना निवेदन देताना आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष किशोरभाई गायकवाड , कर्जत नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती राहुल डाळिंबकर , कर्जत शहर अध्यक्ष अरविंद मोरे ,मनोज गायकवाड , किशोर जाधव , राहुल गायकवाड , सुनील सोनावणे , संतोष जाधव ,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.