भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्वानाच संगणकाचे ज्ञान असल्यास शिक्षण क्षेत्रात गरुड भरारी घेण्यास विद्यार्थ्यांना भविष्यात कुठलीच अडचण येणार नाही , हा दूरदृष्टीकोन समोर ठेवून कर्जत नगर परिषद हद्दीत असलेल्या कर्जत उर्दू शाळेला शिवसेना कर्जत शहर संघटक नदीम खान यांच्या विशेष प्रयत्नाने कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी संगणक भेट दिली.
नेहमीच गरजवंताला मदतीचा हात देणारे शिवसेना शहर संघटक नदीम खान यांचे कार्य कर्जत तालुक्यात नेहमीच चर्चेचा विषय असतो . शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान असणे काळाची गरज आहे , हे लक्षात घेवून रायगड जिल्हा परिषदेची कर्जत उर्दू शाळेत हि कमतरता दिसल्याने त्यांनी लागलीच कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना हि बाब सांगून या शाळेला संगणक भेट देण्याची विनंती केली.
कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिलेला संगणक भेट वस्तुचा वापर आता शाळा सुरू झाल्याने सर्व शालेय विद्यार्थीना होत आहे , हे बघून खरोखरच सर्वधर्म समभावाची भावना मनी ठेवून नेहमीच करत आलेले नदीम खान यांचे कार्य फलित झालेले दिसून येत आहे . याबद्दल आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिलेल्या संगणक भेटीबद्दल शिवसेना शहर संघटक नदीम खान यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.