Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यात अखेर आमदार महेंद्र शेठ थोरवेच अजिंक्य !

कर्जत तालुक्यात अखेर आमदार महेंद्र शेठ थोरवेच अजिंक्य !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत विकासाची गंगा नेल्याने कर्जत तालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत सहा ग्रामपंचायतीचे थेट सरपंच हे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली जिंकून शिवसेनेचा ” भगवा ” फडकला आहे . त्यामुळे खऱ्या अर्थाने मतदारांनी त्यांच्या विकास कामांवर प्रभावित होत , त्यांना या मतदार संघात ” अजिंक्य ” ठरवल आहे.

नसरापूर , वदप , गौरकामत , ओलमन , अंभेरपाडा , खांडस आणि नांदगाव या सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचे मतदान हे ५ नोव्हेंबर २०२३ रोजी झाले . कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे – शिवसेना , उद्धव ठाकरे गट शिवसेना – उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब गट – माजी आमदार सुरेशभाऊ लाड , तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गट – माजी राजिप उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे , भारतीय जनता पक्ष – आमदार प्रशांत ठाकूर , महाराष्ट्र नवनिर्माण सेना – जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , या पक्षातील प्रमुखांची अस्तित्वाची लढाई या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत दिसून आली , कोण बाजी मारून आपल्या पक्षाचा झेंडा फडकवणार , याकडे समस्त कर्जत तालुक्याचे लक्ष लागून होते , या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात कुणाची ताकद जास्त आहे , हे पहाण्यास मिळणार होते.
अखेर सात पैकी नसरापुर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे थेट सरपंच निवडून आले तर सहा जागेवर दिग्विजय प्राप्त करत ” आमदार महेंद्र शेठ थोरवे हे अजिंक्य झाल्याचे दिसून आले.

मतदारांनी दिलेला आम्हाला कौल म्हणजे , करोडो रुपयांचा निधी या तालुक्यात आणून आम्ही विकास साधला , म्हणून विकास कामांना प्राधान्य देवून आमचा दणदणीत विजय प्राप्त झाला असून , हे श्रेय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , विधानसभा संघटक शिवराम बदे , तालुका प्रमुख संभाजी जगताप , त्याचप्रमाणे इतर शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेना – महिला आघाडी यांचे असल्याचे मत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त करत निवडून आलेले सर्व विजयी सरपंच पदाचे उमेदवार व सदस्य यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
 
- Advertisment -

You cannot copy content of this page