Sunday, June 22, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यात पाणी योजना आणि रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र शेठ थोरवे...

कर्जत तालुक्यात पाणी योजना आणि रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते संपन्न !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील पाणी टंचाई आपल्या विशेष प्रयत्नातून कामे मंजूर करून दूर करण्याचा विडा उचलून भविष्यात पाणी टंचाई दूर करून महिलांना न्याय देण्याच्या उद्दात हेतूने कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ सदाशिव थोरवे हे कार्य करत असून , त्यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातून मंजूर झालेल्या कामांचा भुमीपुजन सोहळा शुक्रवार दि . २३ जून २०२३ रोजी सकाळी १० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी 1) उमरोली पाणी योजना 5.11,10,94,169/- , 2) चिंचवली पाणी योजना 5.4,96,96,504/- , 3) नेरळ-ममदापुर – भडवल रस्ता तयार करणे 5.3,11,00,000/- अश्या कामांचे भूमिपूजन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते झाले .
या भूमिपूजन कार्यक्रमास उमरोली ग्रामपंचायत , चिंचवली ग्रामपंचायत , नेरळ ममदापूर – भडवल ग्रामपंचायत परिसरातील सरपंच अनेक सदस्य , शिवसेनेचे पदाधिकारी , शिवसैनिक व ग्रामस्थ , महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page