Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ हरपला !

कर्जत तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ हरपला !

आरपीआय चे कर्जत तालुका अध्यक्ष भाई किशोर गायकवाड यांचे दुःखद निधन !

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) कर्जत तालुक्यातील पँथर काळातील फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले गटाचे कर्जत तालुका अध्यक्ष भाई किशोर गायकवाड यांचे दि .१८ जुलै २०२२ रोजी सकाळी १० वाजता दुःखद निधन झाले.” पँथरचा ढाण्या वाघ हरपला ” हि बातमी तालुक्यात समजताच सर्वांनीच त्यांच्या रहात्या घरी किरवली येथे धाव घेत त्यांचे अखेरचे दर्शन दुःखद अंतःकरणाने घेतले.

भाई किशोर गायकवाड कर्जत तालुक्यातील अत्यंत डॅशिंग नेतृत्व होते . धिप्पाड देहाचे , उंच पुरे किशोर भाई बघता क्षणीच त्यांची कामे होत होती , गेली ४० वर्षे ते समाजकारण , राजकारण व आंबेडकरी चळवळीत काम करत असताना तालुक्यात बहुजन समाजावर कुठेही अन्याय अत्याचार झाल्यास त्यांची हजेरी प्रथम असायची.ठाणे जिल्ह्यापर्यंत त्यांचे कार्य होते.

कामगार नेते श्याम गायकवाड , कॉम . नाना ओव्हाळ , यांच्या सोबत त्यांनी काम केले होते. अनेक वर्षे , अनेक वेळा ते आरपीआय आठवले गटाचे कर्जत तालुका अध्यक्ष होते.अनेक आंदोलने – मोर्चे – उपोषणे करून सामाजिक चळवळीत त्यांनी भाग घेत न्यायनिवाडा केला असल्याने सर्वच क्षेत्रात त्यांचा दबदबा होता . तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला होता.

तर परिसरातील तरूणांना व्यायाम , छडीपट्टा , दांडपट्टा शिकवून स्वसंरक्षण शिकवून ते ” वस्ताद ” म्हणून प्रसिद्ध होते. किरवली ग्रामपंचायतीवर ते उपसरपंच म्हणून काम करताना परिसराचा मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास घडविला होता.गेली दोन वर्षांपासून ते प्रकृती अस्वस्थतामध्ये होते.मात्र काळाने अखेर त्यांच्यावर झडप टाकून त्यांनी अखेर सर्वांनाच चटका लावून गेले.

त्यांच्या अंत्ययात्रेत त्यांचे सहसोबती स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव , आरपीआय जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड , वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य दिपक दादा मोरे , बंधू लक्ष्मण अभंगे , कोकण संपर्कप्रमुख मारुती दादा गायकवाड , जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड , खालापूर ता. अध्यक्ष महेंद्र धनगावकर , युवक जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड , कर्जत न .प. बांधकाम सभापती राहुल डाळींबकर , खोपोली नगरसेवक तथा कामगार नेते किशोर पानसरे , एसआरपी ता .कार्याध्यक्ष गौतम ढोले , उपाध्यक्ष चंद्रकांत धनवटे , मनोज गायकवाड , अण्णा खंडागळे , शहर अध्यक्ष अरविंद मोरे , जनार्दनदादा कांबळे , धम्मकाया फाउंडेशनचे प्रविण पंडीत , सचिन चव्हाण , निलेश डोळस , सामाजिक कार्यकर्ते शरद दादा मोरे , वंचित चे ता . अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे ,अविनाश सोनावणे , अंकुश सुरवसे , त्याचप्रमाणे कर्जत – खालापूर तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी , धार्मिक , राजकीय , शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व बहुजन समाज यावेळी उपस्थित होते . किशोर भाई यांच्या अकाली निधनाने बहुजन समाजात खूप मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या सामाजिक, राजकीय, डॅशिंग नेतृत्व कार्याची आठवण नेहमीच सर्वांच्या हृदयात तेवत राहील.

- Advertisment -

You cannot copy content of this page