Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यातील पोलीस पाटील यांचे झाले कोरोना लसीकरण.

कर्जत तालुक्यातील पोलीस पाटील यांचे झाले कोरोना लसीकरण.

उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांचे सहकार्य..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील सर्व गावांच्या पोलीस पाटील यांना कोविड-१९ लसीकरण करण्यात आले.कर्जतच्या उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी श्रीमती वैशाली परदेशी यांच्या मार्गदर्शनाने त्याच प्रमाणे कर्जत तालुक्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संदीप रामचंद्र भोईर त्यांच्या प्रयत्नाने हे लसीकरण कर्जत उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.

तालुक्यातील प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत रहावे ,म्हणून महसूल विभागातर्फे पोलीस पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली असते. कर्जत पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत काम करणारे पोलीस पाटील पोलीस ठाणे व नागरिक यांच्या मधले महत्वाचा दुवा असतो.

त्यामुळे आताच्या घडीला त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असल्याने सातत्याने गावागावात नागरिकांत मिसळत असल्याने संपर्क होऊन त्यास कोरोना संसर्ग महामारीपासून बचाव होण्यासाठी ही कवच कुंडले रुपी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

याबाबतीत कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांनी योग्य सहकार्य केले.यावेळी तालुक्यातील कर्जत ,नेरळ ,कशेळे, कडाव ,त्याचप्रमाणे सर्व महिला व पुरुष पोलीस पाटील यांनी कोरोना लसीकरणाचा पहिला डोस कर्जत उपजिल्हा रुग्णालयात घेतला.पोलीस पाटील संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष संदीप रामचंद्र भोईर यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांचे आभार व्यक्त केले

- Advertisment -

You cannot copy content of this page