Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत रेल्वे स्टेशन वरील शौचालयाचे काम मार्गी लावा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन...

कर्जत रेल्वे स्टेशन वरील शौचालयाचे काम मार्गी लावा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन !

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत रेल्वे एक नंबर फलाटावरील सहा महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असलेल्या शौचालय व मुतारी संदर्भात स्थानिक प्रवाशांचे होणारे हाल व प्रवाशांच्या येणाऱ्या तक्रारी याचा विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी तालुका उपाध्यक्ष महेंद्र दादा निगुडकर यांनी कर्जत रेल्वे स्टेशनचे स्टेशन निरीक्षक यांची भेट घेऊन लोकांना होणारा गैरसोयीबद्दल जाब विचारला तसेच १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत जर शौचालय व मुतारीचे काम पूर्ण नाही झाले तर रेल्वे प्रशासनास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल ,असा इशारा मनसे पदाधिकारी यांनी दिला.

कर्जत रेल्वे स्टेशन मुंबई – पुणे रेल्वे मार्गाचा मध्य आहे. त्यामुळे येथे अनेक मेल एक्सप्रेस गाड्या थांबतात.रेल्वे फलाट क्रमांक १ वर या गाड्या थांबत असतात.यावेळी गाडी पकडण्यासाठी वेळेच्या आधी आलेल्या महिलावर्ग ,नागरिक व तरुण – तरुणी ,लहान मुले यांना शौचालय नसल्याने ऐन प्रसंगी खूपच अडचण निर्माण होते. नैसर्गिक विधी ला रोख लावण्याचे काम रेल्वे प्रशासन करत असताना दिसत आहेत.

सहा महिन्यांपूर्वी या शौचालय व मुतारीवर झाड पडले होते, तेंव्हापासून ही शौचालय व मुतारी बंद अवस्थेत आहे , त्यामुळे नागरिकांची खूपच गैरसोय होत आहे.नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी रेल्वे प्रशासनास धारेवर धरून जाब विचारला . शौचालय काम त्वरित चालु न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा ईशारा आज देण्यात आला.

यावेळी रेल्वे प्रशासनास निवेदन देते वेळी माजी तालुका उपाध्यक्ष महेंद्र दादा निगुडकर , तालुका उपाध्यक्ष विलास डुकरे, शहर अध्यक्ष समीर चव्हाण, माजी नगरसेवक धनंजय दुर्गे,अक्षय महाले,संजय तन्ना, चिन्मय बेडेकर, मनविसे तालुका उपाध्यक्ष सतीश कालेकर, उपाध्यक्ष दिनेश बोराडे,निवृत्ती गोसावी, उपशहर अध्यक्ष राजेश साळुंखे, उपशहर अध्यक्ष प्रज्योत घोसाळकर, महिला उपाध्यक्षा आकांशा शर्मा,महेश लोवंशी, संदेश काळभोर, शुभम दुर्गे,दिप्तेश शेळके, पारस खैरे, टिंकु लोभी,मिलिंद लदगे,सुशांत चव्हाण वल्लभ चितळे आदी समस्त महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page