भाजप कोकण संघटक सुनील गोगटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य..
(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे )
आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करणारे कर्जतमधील भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांनी आपण समाजातील राहणाऱ्या गोरगरीब ,जेष्ठ नागरिक यांना मदत केल्यास त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदात भरभरून आशीर्वाद असतात ,हा उद्दात्य हेतू मनात बाळगून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जतमधील हॅप्पी फ्लॉक ओल्डेज होम येथील वृद्धांना फळवाटप व कोरोना काळात त्यांची सुरक्षा व्हावी ,म्हणून मास्क वाटप करण्यात आले.
भाजप कोकण संघटक सुनील गोगटे दरवर्षी आपला वाढदिवस वेगवेगळे लोकोपयोगी सामाजिक उपक्रम कार्यक्रम करून साजरा करतात.कोरोना काळात गेल्यावर्षी मास्क व सॅनिटायझरचे वाटप शाररिक तपासणी ,तर शेतकऱ्यांना खतांचे व बी बियाणांचे वाटप , गोरगरीब गरजू ,तसेच हातावर कमावणारे मजूर ,आदिवासी बांधव यांना राशन धान्य वाटप , रेनकोट वाटप आदी उपक्रम त्यांनी आजपर्यंत राबविले असताना यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भारतीय जनता पार्टी युवा कर्जत शहराच्या वतीने हॅपी फ्लॉक ओल्डेज होम येथे वृद्धांना मास्क आणि फळवाटपाचा कार्यक्रम केला.
यावेळी जेष्ठ वृद्धांच्या चेहेऱ्यावरील दिसणारा आनंद हेच त्यांना दिलेले आशीर्वाद व कुणीतरी या आश्रमात आपली माणस आल्यासारखी वाटली असेच ऋणानुबंध ठेवा अशा शुभेच्छा रुपी आशीर्वाद तेथील वृद्धांनी त्यांना दिले.तुमचे आशीर्वाद आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची उमेद देतील ,असे मत भाजप युवा पदाधिकारी यांनी व्यक्त केले.या प्रसंगी भाजप युवा मोर्चा कर्जत तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील,शहर अध्यक्ष मयूर शीतोळे,सर्वेश गोगटे,प्रणव पाटील,ऋत्विक आपटे,सुजल गायकवाड, अभिषेक तिवारी आदी उपस्थित होते.