Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये इमारत बांधणाऱ्या कामगारांची सुरक्षा धोक्यात !

कर्जतमध्ये इमारत बांधणाऱ्या कामगारांची सुरक्षा धोक्यात !

संबंधित अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष , कामगार संघटना हि बिनकामाच्या…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत नगर परिषद हद्दीत सध्या सर्वच प्रभागात मोठं मोठे टॉवर इमारत बांधणीचे कामे सुरू आहेत . ५ माळ्या पासून १५ माळ्यापर्यंत इमारती कामगार वर्ग बांधत असताना बिल्डर हे त्यांच्या सुरक्षिततेची कुठलीच साधने पुरवित नसल्याने इमारत बांधकाम व्यावसायातील कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे . सुरक्षिततेची साधने नसल्याने अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला असून , तरीही संबंधित अधिकारी वर्ग याकडे गांभीर्याने बघत नसून , इमारत व्यावसायिक कामगार संघटना देखील बिनकामाच्या ठरत आहेत.


कर्जत शहरात भिसेगाव प्रभागात ” अरिहंत अलोकी ” या इमारत संकुलात १५ माळ्याची इमारत बांधण्याचे काम सुरू आहे . इमारतीच्या बाहेरून काम करणारे बांधकाम कामगार यांना इतक्या वर प्लास्टर , रंगकाम , बाथरूम पाईप लाईनचे काम करताना सुरक्षिततेची कुठलीच साधने बिल्डर्स देत नसल्याचे दिसून येत आहे.


यापूर्वी देखील ” अरिहंत अलोकी ” या इमारती मध्ये सुरक्षित साधने नसल्याने कामगारांचा शॉक लागून मृत्यू झाला होता . तर मुख्य गेट कोसळून कामगाराला दुखापत झाली होती . तर भिसेगाव येथील ” राधेय गॅलेक्सी ” या इमारत संकुलातील भली मोठी सुरक्षा भिंत कोसळली होती . तर शहरात इतर ठिकाणी देखील सुरक्षिततेची साधने बिल्डर्स देत नसल्याने छोटी – मोठी अपघात झालेली असल्याने या गंभीर जीवघेण्या बाबी ” सेटलमेंट ” करून दाबल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहेत .


त्यामुळे कामगारांच्या जीवाला धोका असून या गंभीर जीवघेण्या समस्येकडे संबंधित कर्जत नगर परिषदेचे अधिकारी वर्ग , कर्जत पोलीस ठाणे , कर्जत तहसीलदार लक्ष देत नसल्याने अनेक ठिकाणी अश्या जीवघेण्या घटना घडल्या असताना याविरोधात बांधकाम कामगार संघटना देखील मूग गिळून गप्प आहेत , त्यामुळे या सर्वांवर कायदेशीर कारवाई होऊन , कर्जत शहरातील बांधकाम इमारतीच्या जागेवर पाहणी करून बिल्डर्स सुरक्षिततेची साधने बांधकाम व इतर इमारतीची कामे करणाऱ्या कामगार वर्गाला देतात की नाही , याची चौकशी करून संबंधित बिल्डर्सवर कडक कारवाई करावी , अशी मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटना व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने केली आहे .




- Advertisment -

You cannot copy content of this page