Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये "ऐतिहासिक सोहळ्यास "सर्वांनी उपस्थित रहा-आमदार महेंद्र शेठ थोरवे..

कर्जतमध्ये “ऐतिहासिक सोहळ्यास “सर्वांनी उपस्थित रहा-आमदार महेंद्र शेठ थोरवे..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघाचे ” नंदनवन ” करण्याचे स्वप्न प्रत्येक्षात उतरवून तीन वर्षांत ८०० कोटींचा निधी आपल्या मतदार संघात आणून अल्पावधीतच ” विकासाची गंगा ” ग्रामीण भागापासून – शहरापर्यंत आणणारे ” विकास पुरुष ” कार्यसम्राट लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी रविवार ७ जानेवारी २०२४ रोजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते होणाऱ्या ” ऐतिहासिक वास्तूंचे ” लोकार्पण व अनेक कामांचे भूमिपूजन व ऐतिहासिक सभेस पोलीस ग्राउंड – कर्जत येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून ” इतिहासाचे साक्षीदार ” बना , असे निमंत्रण आज ” बाळासाहेब भवन ” येथे पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दिले . या पत्रकार परिषदेस प्रमुख उपस्थिती आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य भाई गायकर , खालापूर शिवसेना नेते अमोल पाटील , विधानसभा नेते पंकज पाटील , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे ,नगरसेवक संकेत भासे , अरुण देशमुख , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर संघटक नदीम भाई खान , त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या २७२ कोटींच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन उद्या होत असताना यांत अनेक कामांची यादीच त्यांनी जाहीर केली . यांत नेरळ – जुंमापट्टीचा रस्ता १८ कोटी , समावेश असल्याचे सांगून दोन वर्षे कोरोना काळात गेले तरीही अल्पावधीतच आपल्या सर्वांच्या समस्या मार्गी लावण्याचा हा प्रयत्न असून ही विकास कामे नसून पुढच्या पिढीस घेवून जाणारा ” सांस्कृतिक व ऐतिहासिक ” वारसांचा अनमोल ठेवा आहे , असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले .या मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून हि मला मिळालेली संधी असून यातंच मला स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली , यावर त्यांनी प्रकाश टाकला . या मतदार संघातील रस्ते व्यवस्थित झाल्याने पर्यटक वाढले आहेत , आणि या ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून कर्जतच्या सौंदर्यात अजून भर पडणार आहे . खोपोली – कर्जत – माथेरान ही शहरे विकसित झाल्याने ” चला घडवू या नंदनवन – कर्जत खालापूर नंबर वन ” असा संकल्प पूर्णत्वास नेत असल्याचे भाकीत त्यांनी स्पष्ट केले.

आजपर्यंत ८०० कोटींचा निधी या मतदार संघात आणला आहे , तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पेण अर्बन बँकेचे काम होण्यासाठी आग्रही रहाणार आहे , कर्जतच्या पाणी प्रश्नास निधी उपलब्ध करून हि समस्या लवकरच सोडवणार ,माथेरान रोप – वें चे काम लवकरच मार्गी लावणार , खालापूर येथील स्त्यांची कामे सुरू आहेत , खालापूर येथे ग्रामीण भागात १२०० एकर जागेत नवीन midc तयार करणार , तेथील पाण्याची स्कीम देखील होणार आहे , कर्जत मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन जागेचा वाद सुरू आहे , पण लवकरच जागेचा वाद संपुष्टात आणून ५ कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असे हि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी जाहीर केले.
नेरळ व्यापारी संकुल बाबत लवकरच निर्णय होणार , रेल्वे गाड्या सुरू करण्याबाबत लवकरच खासदार आप्पासाहेब बारणे यांना घेवून रेल्वे मंत्री , अधिकारी वर्गाशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार , भिसेगाव भुयारी मार्ग लवकरच मार्गी लावणार , निधी उपलब्ध झालेला आहे , या भुयारी मार्गाला ” स्वर्गीय अनंत काका जोशी ” यांचे नाव देणार , ११ धर्म शाळेला ज्या दिंड्या पंढरपूर येथे जातात त्यांना उद्याच्या कार्यक्रमात ३२ लाख रुपये मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते देणगी देणार ,केळवली – बीड – जांबरुख – खोपोली रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल , लवकरच ट्रामा केअर सेंटर खोपोलीला उभे करणार , कर्जत व खोपोलीत पत्रकार भवन उभारणार , ढाक गावात अनेक समस्या आहेत , ते गाव सोई सुविधाने वंचित राहू नये , म्हणून ही बाब मुख्यमंत्री यांच्याकडे मांडून समस्या सोडवणार , अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उद्याच्या ऐतिहासिक सभेस ३० हजाराच्या वर गर्दी होणार असून हा सोहळा ” न भूतो – न भविष्यती ” असा होणार असल्याने या ” ऐतिहासिक वास्तूंच्या सोहळा ” कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून ” सुवर्ण काळाचे साक्षीदार बना ” , असे आवाहन व निमंत्रण कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सर्वांना केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page