गुन्हेगारांना अटक करण्यात कर्जत पोलीस स्टेशनला यश.
भिसेगाव- कर्जत( सुभाष सोनावणे )कोरोना काळानंतर बेरोजगारीत असलेल्या तरुणांना वेळीच रोखणे गरजेचे असून अन्यथा लागलेल्या पैशाच्या चणचनीमुळे वाम मार्गाचा अवलंब करून गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्यापासून रोखणे कुटुंबातील आई – वडिलांचे काम असून याकडे दुर्लक्ष केल्याने कर्जतमध्ये तरुणाईला खुनाच्या गुन्ह्यात नुकतीच अटक करण्यात आले.
कर्जत नगर परिषद हद्दीतील कर्जत – कडाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या पुढे सेवालाल नगर येथे झालेल्या पैशाच्या देवानघेवान वरून झालेल्या भांडणात चाकू भोसकल्याने अनिल चव्हाण यांचा जीव गेला असून या खुनाच्या गुन्ह्यात रोहन गुंजाळ , सुमित गुंजाळ यांच्यासह दोन आरोपी कर्जत पोलीस ठाण्याने अटक केली आहे.कर्जत शहरातील दहिवली भागातील सेवालाल नगर मध्ये पूर्ववैमनस्यातून झालेल्या राड्यात चाकू आणि दगड यांच्या सहाय्याने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले होते.
त्यातील अनिल चव्हाण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला असून त्यातील अन्य जखमींपैकी एक अत्यवस्थ आहे.कर्जत शहरातील दहिवली मध्ये सेवालाल मंदिरासमोर १८ डिसेंबर २०२१ च्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांमध्ये पैशाच्या देवाण घेवाण वरून बाचाबाची झाली त्यात वस्तीमधील रोहन गुंजाळ हा गणेश संजय राठोड यांच्याकडे पैशाची मागणी करत होता मात्र गणेशने रोहन ला पैसे देण्यास नकार दिला.म्हणून रोहन गुंजाळ याने निलेश गॅरेजवाला , सुमित गुंजाळ व एक मित्र यांस बोलावून अनिल हरी चव्हाण , सुनील हरी चव्हाण , रवी चव्हाण यांना शिवीगाळ करू लागले या सर्वांनी संगणमत करून बाबू उर्फ सुमित गुंजाळ याने त्या ठिकाणी आलेले अनिल हरी चव्हाण आणि सुनील हरी चव्हाण यांच्याशी असलेले पूर्ववैमनस्यातून धारदार चाकूच्या साह्याने पाठीवर वार केले.
अचानक झालेल्या हल्ल्यात सोहम संजय मोरे , अनिल हरी चव्हाण , सुनील हरी चव्हाण आणि गणेश संजय राठोड हे जखमी झाले उपचारादरम्यान अनिल हरी चव्हाण यांचा मृत्यू झाला.तर तिघे जबर जखमी झाले. सदर घटनेबाबत कर्जत पोलिस ठाण्यात ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे . कर्जत पोलिस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की तसेच पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे अधिक तपास करत आहेत.