Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये भीम महोत्सव - २०२३ जयंती प्रबोधन कार्यक्रमात ख्यातनाम गायक " आनंदजी...

कर्जतमध्ये भीम महोत्सव – २०२३ जयंती प्रबोधन कार्यक्रमात ख्यातनाम गायक ” आनंदजी शिंदे ” यांचा जलसा गीतांचा जल्लोष !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की , १० सभांमध्ये जे प्रबोधन होते ते एका ” जलसा ” गीत गायनाच्या कार्यक्रमाने होते , म्हणूनच कर्जत तालुक्यातील तमाम बहुजन वर्ग – आंबेडकरी अनुयायी यांनी मिळून २५ मे भीम महोत्सव – २०२३ आयोजित जयंती कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांची जयंती म्हणजे चळवळीचे प्रतिक असल्याने महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक छत्रपती शिवाजी महाराज – फुले – शाहू – आंबेडकरी विचारधारेवर प्रबोधन गायक आनंदजी शिंदे यांचा प्रबोधन गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . या कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायी व बहुजन वर्गाने तुफानी गर्दी करत उत्स्फूर्त साथ दिली . ” भारताचे गान सम्राट प्रल्हादजी शिंदे ” यांचे मानसपुत्र व भीम महोत्सव कमिटी चे ज्येष्ठ संघटक तथा कर्जत न. प. चे प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव यांच्या विनंतीला मान देवून आलेले गायक ” आनंदजी शिंदे ” यांनी उपस्थित नागरिक व महिलांना आपल्या सुरेख आवाजाने व महापुरुषांची गीते गाऊन चार तास मंत्रमुग्ध केले.

त्यांनी सादर केलेले ” जो बाळा जो जो रे जो…..दोनच राजे इथे गाजले……कोकण पुण्य भूमीवर …….तु लाख हिफाजात करले , तु लाख करले रखवाली , उड जायेगा एक दीन पंच्छी रहेगा पिंजरा खाली….नव्हत मिळत पोटाला , आता कमी नाही नोटाला , माझ्या भीमाची पुण्याची , अंगठी सोण्याची बोटाला….राजा राणीच्या जोडीला ……पाच मजली माडीला……हे कुणाचं योगदान…..लाल दिव्याच्या गाडीला…..आनंद झाला माझ्या मनाला….म्हणून कर्जत नटला भीम महोत्सवाला ….. नांदन नांदन होत रमाच नांदन…. भीमाच्या संसारी होत टपोर चांदणं……अशी अंगाला शहारे येणारे व आपल्या पहाडी आवाजात गात शेर – शायरी करत त्यांनी सर्वांचीच मने जिंकली.

भीम महोत्सव कमिटीचे अध्यक्ष – नगरसेवक उमेश गायकवाड , सुनिल यशवंत गायकवाड – उपाध्यक्ष , सुरेश सोनावळे – उपाध्यक्ष , सचिन रमेश गायकवाड – सचिव , खजिनदार रामदास गायकवाड , सहखजिनदार ऍड . शैलेश पवार , माजी अध्यक्ष जनार्दन खंडागळे , माजी अध्यक्ष सुनिल गायकवाड ,माजी अध्यक्ष हिरामण गायकवाड , सल्लागार – बी.जी. गायकवाड , मनोहर ढोले , के.के. गाडे , रमेश खैरे , दौलत ब्राह्मणे , संघटक – उत्तम भाई जाधव , प्रभाकर दादा गोतारणे, सिद्धार्थ सदावर्ते, सचिन भालेराव , योगेश गायकवाड, गणेश कांबळे , भालचंद्र गायकवाड , संतोष सोनावणे, प्रतीक गायकवाड, प्रणित गायकवाड , आदी सदस्य महिनाभर संपूर्ण तालुक्यात फिरल्याने तुफान गर्दी दिसण्यात आली . भीम महोत्सव कमिटीच्या वतीने यावेळी आनंदजी शिंदे यांचा शाल – पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवर शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजिप चे उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे , नगराध्यक्षा सुवर्णा जोशी , माजी नगराध्यक्ष राजेश लाड , माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड , माजी उपसभापती मनोहरदादा थोरवे , माजी सरपंच मधुकर घारे , नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , बळीराम देशमुख आदी उपस्थितांचा सत्कार यावेळी कमिटीच्या वतीने करण्यात आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page