Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये विजयादशमी निमित्त मैत्रीबोध परिवाराची " मैत्रीपूर्ण शोभायात्रा " काढून आनंदोत्सव !

कर्जतमध्ये विजयादशमी निमित्त मैत्रीबोध परिवाराची ” मैत्रीपूर्ण शोभायात्रा ” काढून आनंदोत्सव !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) विजयादशमी व दसरा सणा निमित्त कर्जत तालुक्यातील जांबरुंग परिसरातील कामतपाडा येथील ” मैत्रिबोध ” परिवाराच्या वतीने कर्जत शहरातून रोमांचकारी मैत्रीपूर्ण शोभायात्रा काढून आनंदोत्सव साजरा केला . यावेळी जांबरुंग परिसरातील असंख्य आदिवासी , कोळी महिलांसह ग्रामस्थ या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. जवळ जवळ एक की. मी. अंतरापर्यंत असलेल्या या शोभा यात्रेला पहाण्यास असंख्य कर्जतकर उपस्थित होते.

दसरा निमित्त काढलेल्या या शोभा यात्रेत ४३ गांवातील ३५०० हजार महिला ग्रामस्थांसह प्रत्येक गावाचा एक पेहराव पारंपरिक ढोल, ताशांसह , गाणी गात , नृत्य करत भव्य शोभायात्रेला सकाळी अकराच्या सुमारास कर्जत शहरात सुरुवात झाली.
श्रीराम पुलापासून निघालेली ही शोभायात्रा आमराई मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावरून श्री कपालेश्वर मंदिर , श्री मारुती मंदिरानंतर कर्जत नगरपरिषद कार्यालय ते अभिनव ज्ञान मंदिरमार्गे वाजत गाजत निघाली होती . लेझीमच्या तालावर, पारंपरिक नृत्य व गाणी गात लेझिम , गरबा खेळत श्रीराम पुलावर आणण्यात होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही शोभायात्रा सुरू होती. हि शोभायात्रा कर्जतच्या इतिहासात नवचैतन्य निर्माण करणारी अभूतपूर्व अशी ठरली.

यावेळी कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या पोसरी निवासस्थानी त्यांनी दर्शन व पूजा करून देवीचे दर्शन घेतले . मैत्रिबोध परिवाराचे ” दादाश्री ” यांचे नेहमीच माझ्यावर व कर्जतवर आशीर्वाद असून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक नवचैतन्य निर्माण होण्यासाठी काढलेल्या या शोभायात्रेला त्यांनी मनापासून शुभेच्छा व्यक्त केल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page