Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये "हजरत  सय्यद  युसूफशाह बाबांचा उरूस " उत्साहात साजरा !

कर्जतमध्ये “हजरत  सय्यद  युसूफशाह बाबांचा उरूस ” उत्साहात साजरा !

भिसेगाव -कर्जत (सुभाष सोनावणे ) सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले ” हजरत सय्यद युसूफ शाह बाबांचा ” उरूस  दि .६ एप्रिल २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला , यानिमित्ताने बाबांच्या भक्तांनी व उरूस कमिटी ने दर्ग्यात जय्यत तयारी केली होती , मात्र रमजान महिना व निवडणुकीची आचार संहिता असल्याने कर्जत शहरांमधून संदल मिरवणूक निघाली नाही.

     हजरत सय्यद युसूफ शाह बाबांचा कर्जतमधील दर्गा मुंबई पासून पुण्या पर्यंत प्रसिद्ध आहे .या बाबांचे हजारो भक्त असून सर्व जाती धर्माचे आहेत .जवळ जवळ १०० वर्षे येथे बाबांच्या उरुसाला होत असल्याचे समजते . प्रतिवर्षी या उरुसाला सर्वच समाजाचे भक्तगण , मुस्लिम समाज आवर्जून उपस्थित रहातात . बाबांच्या दर्ग्यात मागितलेली मन्नत पूर्ण होते ,अशी भक्तांची धारणा असल्याने पूर्ण झालेली मन्नत फेडण्यासाठी अनेक कुटुंब या दिवशी येतात .जुने आजार , वाईट पीडा , दोष धारणा ,भूत-प्रेत बाधा , यासारखे बाधीत कुटुंबे इथे येतात , त्याचप्रमाणे बाबांच्या या दर्ग्याचे मुंबई पासून पुण्यापर्यंत व रायगड जिल्हा , कर्जत तालुक्यातील असलेले भक्त येथे सकाळपासून हजर रहातात. येथे अनेक भक्त प्रसाद वाटप करतात तर अनेक सेवाभावी संघटना , मंडळे व भक्तगण यांनी खीर , सरबत , नाश्ता , प्रसाद म्हणून भाविकांसाठी ठेवले होते .मोठ्या उत्साहात हा उरूस साजरा करण्यात आला.

तर हजरत कमलुद्दीन शाह बाबा उर्फ सर्कीट शाह बाबा मुंबई – गोवंडी कमिटी अध्यक्ष संजू दादा इंगळे आणि मित्र परिवार यांनी येणाऱ्या भक्तांना न्याज ( जेवण ) ठेवले होते . हजरत कमलुद्दिन शाह बाबा , उर्फ सर्किट बाबा ग्रुपचे कर्जत – मुंबई – पुणे – लोणावळा – गोवंडी – खोपोली – चेंबूर – अंबरनाथ येथील भक्तगणांचे अध्यक्ष संजू दादा इंगळे , बंटी पालांडे , नौशाद बादशाह पुरी , संदीप पालांडे , अमर सावंत , सुलेमान शेख , मसूद सय्यद , मोहसीन खान , अजय मोरे ग्रुप – पंचशील नगर गुंडगे , उमेश इंगळे , अनिल पाटील , निलेश भालेराव , चेतन गायकवाड ,आदी भक्तगण उपस्थित होते.

यावेळी या उरुसास कर्जत न.प. मा. प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव , नगरसेवक उमेश गायकवाड , शिवसेना कर्जत शहर संघटक नदीम खान , बी एस पी चे सचिन चव्हाण , रेल्वेचे NRMU अध्यक्ष महेश भोसले , असलम खान , झहीर खान , रफिक शेख , राजू शेख , त्याचप्रमाणे अनेक राजकीय ,धार्मिक मंडळी , मुस्लिम समाज कमिटी , व बांधव , महिला वर्ग यांनी सकाळपासूनच दर्शनाचा लाभ घेतला .यावेळी नदीम भाई खान यांच्या विनंतीनुसार कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आमदार निधीतून दर्गाह परिसरातील गार्डन – रोषणाई – सुशोभीकरण व रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने येथील परिसर रंगबिरंगी प्रकाश झोताने उजळून निघाला होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page