Tuesday, December 3, 2024
Homeपुणेलोणावळाकल्पतरू हॉस्पिटलचे डॉ. निकेश ओसवाल यांच्यावर गुन्हा दाखल करा.लो.शहर. पोलीस स्टेशन वर...

कल्पतरू हॉस्पिटलचे डॉ. निकेश ओसवाल यांच्यावर गुन्हा दाखल करा.लो.शहर. पोलीस स्टेशन वर धडक मोर्चा..

अर्चना शिंदे यांच्या कुटुंबियांना 18 डिसेंबर पर्यंत न्याय न मिळाल्यास,तीव्र आंदोलन करण्यात येईल – सूर्यकांत वाघमारे..

लोणावळा (प्रतिनिधी): हॉस्पिटल कल्पतरू येथे मृत्यू झालेल्या अर्चना सागर शिंदे हिचा मृत्यू हा नैसर्गिक नसून डॉक्टर च्या हलगर्जीपणामूळे झाला असून यास हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मयत अर्चना सागर शिंदे यांच्या घरच्यांकडून करण्यात आला आहे.
अर्चना शिंदे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा व जबाबदार असणाऱ्या डॉ. निकेश ओसवाल यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन लोणावळा शहर पोलीस ठाण्यात महिला आघाडी आर.पी.आय. व सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले आहे.
अर्चना सागर शिंदे हीला डिलेव्हरी साठी कल्पतरू हॉस्पिटल लोणावळा येथे दाखल करण्यात आले होते. तीची दि . 4/12/2022 रोजी कल्पतरू हॉस्पिटलमध्ये सीझर द्वारे डिलिव्हरी करण्यात आली त्यावेळी तिने एका गोंडस बालकाला जन्म दिला.त्यानंतर त्या ठिक होत्या परंतु अचानक त्यांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले. त्यावेळी डॉ. ओसवाल यांना महिलेचा दीर संतोष शिंदे यांनी विचारणा केली असता तुमचा रुग्ण ठिक आहे असे वारंवार उत्तर देण्यात येत होते. रात्री 9 च्या सुमारास हॉस्पिटलचे डॉ. अभय कामत यांनी तुमचा रुग्ण दगावला आहे असे सांगितले.आणि अजून तुम्हाला कोणी सूचना दिली नाही का असे धक्कादायक उत्तर मिळाले.

जर रुग्ण आधीच दगावला होता तर सर्जन डॉ. ओसवाल यांनी आम्हाला उडवा उडवी ची उत्तरे का दिली? त्यांनी आम्हाला रुग्ण दगावल्याचे वेळेतच का सूचना दिली नाही? दुपारपासून सायंकाळ पर्यंत व्यवस्थित असणारी महिला अचानक तीला ओ टी मध्ये नेण्यात का येते? तसेच तिच्या शरीरात 6. इतके रक्त असताना तीचे सीझर केलेच कसे शिवाय याबाबतीत आम्हाला काहीच न सांगता डॉ. ओसवाल यांच्या हलगर्जीपणा मुळेच अर्चना हिचा मृत्यू झाला असल्याची प्रतिक्रिया दीर संतोष शिंदे यांनी अष्ट दिशा शी बोलताना व्यक्त केली.
तसेच मयत अर्चना हिचा मृत्यू डॉ. निकेश ओसवाल यांच्या हलगर्जी पणा मुळेच झाला असल्याचा आरोप पती सागर शिंदे यांनी निवेदनातून केला आहे.अर्चना हिची डिलेव्हरी हि दि.4 रोजी 12:30 च्या दरम्यान झाली. त्या नंतर तिला काय त्रास होता हे डॉक्टरांनी आम्हाला सांगीतले नाही.तुमचे पेशेन्ट हे व्यवसस्थित आहे. असे सांगण्यात आले व त्यानंतर कोऱ्या पेपरवर सह्या घेण्यात आल्या. माझ्या पत्नीला पुन्हा 5:30 वा. ऑपरेशन थियटर मध्ये घेवुन गेले त्या दरम्यान माझ्या पत्नीचे निधन झाले.तरीही मला माझ्या पत्नीचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी न सांगता ते त्यांच्या केबीन मध्ये जावून बसले. असा आरोप निवेदनातून केला आहे.
डॉ. ओसवाल यांच्या विरोधात अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. जो पर्यंत या घटनेचा पूर्ण अहवाल समोर येत नाही तो पर्यंत हॉस्पिटल बंद करण्यात यावे,तसेच डॉ.नितेश ओसवाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आर पी आय महिला आघाडीच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशन वर मोर्चा काढत निवेदन देण्यात आले.
तसेच 18 डिसेंबर पर्यंत पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही तर आर पी आय च्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. आणि त्याचे काही पडसाद उमटल्यास त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा आर पी आय (आठवले ) पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी दिला आहे.
तरी अर्चना शिंदे हीच्या कुटुंबाला न्याय मिळावा,तिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, आणि तिच्या दोन अल्पवयीन बालकांचा पोलीस प्रशासनाने विचार करावा अशी मागणी यावेळी आर पी आय महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page