Friday, November 22, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत उर्दू शाळेचे माजी मुख्याध्यापक बशीर मुजाहिद सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साह...

कामशेत उर्दू शाळेचे माजी मुख्याध्यापक बशीर मुजाहिद सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साह संपन्न !

कामशेत : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकाळे क्र. .3 येथील माजी मुख्याध्यापक अलहाज बशीर महेमूद मुजाहिद सर यांचा सेवा निवृत्ती सत्कार समारंभ उत्सहात संपन्न झाला.

मुजाहिद सर यांच्या सेवा निवृत्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले. मुजाहिद सर यांनी आपल्या जीवनातील 25 वर्ष शाळेच्या विकासासाठी पणाली लावली. तसेच त्यांच्या कार्यकाळात फक्त पाच विध्यार्थ्यांपासून कामशेत येथील उर्दू शाळेत त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास सुरु केला आणि अक्षरशः त्यांनी शिक्षणाची ओढ असलेल्या विध्यार्थ्यांना स्वतः घरातून आणून शिक्षण दिले. त्यांनतर शाळेच्या इतर शिक्षकांच्या साहाय्याने शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करत असताना कामशेत येथील स्थानिक रहिवाशी प्रसिद्ध व्यावसायिक आनंद टाटिया, सुभाष रायसोनी व दिलीप ओसवाल यांनी या उर्दू शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली तर मुस्लिम एज्युकेशन ट्रस्ट कामशेत च्या वतीने तीन माळ्याची इमारत बांधण्यात आली.

या इमारतीत आठ खोल्या काढण्यात आल्या या आठ खोल्यांमध्ये इयत्ता पहीली ते आठवी असे वर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरु करण्यात आले. या शाळेला जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जिल्हास्तरीय पुरस्कार व राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळवून दिला तसेच संगणक वर्ग, विज्ञान प्रयोग शाळा या सारख्या सोईंनी या जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेला शून्यातून प्रशस्त इमारतीपर्यंत पोहचविण्यात मुजाहिद सरांचा सिंहाचा वाटा आहे.

त्याचेच औचित्य साधत आज शाळेच्या वतीने त्यांचा सेवा निवृत्ती सत्कार समारंभ मोठया दिमाखात आयोजित करण्यात आला यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी कामशेतसह लोणावळा, चाकण, पुणे येथील शिक्षक तर कामशेत येथील सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सईद नालमांडू सर, अमीन सर, इरफान शेख(पुणे ), पत्रकार संदीप मोरे,सामाजिक कार्यकर्ते शब्बीर भाई, इरफान बागवान, शफिक अत्तार, इब्राहिम भाई, हबीब नदाफ, मुखतार सर आदी मान्यवर लाभले. यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुजाहिद सर यांना पुष्प गुच्छ, शाल व भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या आनंदोत्साहात शाळेचे शिक्षक बिस्मिल्लाह श. शेख, शेख नदिरा बानो का., दामटे जन्नत शब्बीर, अत्तार रुबीना अशपाक, शेख मिनाज हमीद, सय्यद मुजक्कीर न. सर, सय्यद रुबानी जीलानी सर, शहाबर्फीवाले सुमैया ख.यांसमवेत शाळेतील विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नादेरा कासीम शेख यांनी केले तर मुजाहिद सर यांनी सर्वांचे आभार मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page