Thursday, November 21, 2024
Homeपुणेकामशेतकामशेत पंडित नेहरू विद्यालयात यशवंतराव चव्हाण बालनाट्य स्पर्धांचे आयोजन..

कामशेत पंडित नेहरू विद्यालयात यशवंतराव चव्हाण बालनाट्य स्पर्धांचे आयोजन..

कामशेत : जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा पंडित नेहरु विद्यालय कामशेत या स्पर्धाकेंद्रावर 17 जानेवारी रोजी संपन्न झाली.
जिल्हा परिषदेचे कार्यकुशल सदस्य सन्मा. नितीन मराठे यांनी उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवित स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या, तसेच या स्पर्धांसाठी अंदाजपत्रकात अनुदान मंजुरीचे आश्वासन दिले.
उद्घाटन प्रसंगी खडकाळे ग्रामपंचायत सरपंच मा. दत्ता रावते, ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू शिंदे, तसेच नाट्य समिती सदस्य प्राचार्य विजय जोरी व पत्रकार शिवानंद कांबळे उपस्थित होते.
तालुकास्तरीय या स्पर्धेचे परीक्षण दौंड येथील आरती पाटील, न्यु इंग्लिश स्कूल फुरसुंगी चे श्री. किरण सरोदे तसेच भेकराईनगर फुरसुंगी चे श्री. अशोक तकटे यांनी केले.

या स्पर्धेत तालुक्यातील शाळांमधून विविध गटातील नऊ संघांनी सहभाग घेतला. जिल्हास्तरीय स्पर्धेपुर्वी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल असे परीक्षकांनी सांगितले.
संपूर्ण स्पर्धा गटशिक्षणाधिकारी सन्मा. श्री. सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. उद्घाटनाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका धनश्री साबळे यांनी केले, सूत्रसंचालन प्राची सोनवणे, धनश्री शेलार यांनी केले तर दिपक साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page