Sunday, November 10, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकायदा जनजागृतीचा , प्रत्येकाच्या हक्काचा !

कायदा जनजागृतीचा , प्रत्येकाच्या हक्काचा !

सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ शेडुंग – पनवेल येथे संपन्न..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या जीवनात प्रत्येक कामात कायदा खूप महत्त्वाचा आहे . किबहुणा हा देशच कायद्याच्या आधारावर चालत असतो . या कायद्याच्या आधारावरच घटनेच्या माध्यमातून आपल्याला जीवन जगण्याचा हक्क मिळाला आहे . अन्यथा आपले जीवन व्यर्थ असते , आपल्याला कायद्याचे काय महत्त्व आहे , काय हक्क प्राप्त होतात , हे गावागावात जाऊन त्याची जनजागृती व्हावी म्हणून एक देशव्यापी कार्य ” सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ शेडुंग – पनवेल ” येथे संपन्न झाले . दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ च्या विद्यार्थ्यांनी शेडुंग गावामध्ये ग्रामस्थांना कायद्याबद्दल माहिती व्हावी प्रत्येकाच्या जीवनात दैनंदिन जीवन जगत असताना कायद्याचे ज्ञान किती महत्त्वाचे आहे , याबद्दल जागरूकता व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मृत्युंजय पांडे सर ,उपप्राचार्य डॉक्टर मारूफ बाशीर सर, ज्येष्ठ शिक्षक ऍड. ललित पगारे सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष विधी शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग घेतला. शेडुंग गावचे श्री.रामदास दत्तू खेत्री, सौ.दर्शना मोहन दुर्गे – ग्रामपंचायत सदस्य , सौ.अनिता रामदास खेत्री – माजी सरपंच, श्री.विठ्ठल मारुती दुर्गे – माजी ग्रामपंचायत सदस्य, श्री. प्रकाश दत्तू खेत्री , श्री.भगीरथ दामोदर पाटील व इतर ग्रामस्थ व पदाधिकारी हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

ज्येष्ठ शिक्षक ऍड . ललित पगारे सर यांनी कार्यक्रमाचे प्रयोजन व महत्त्व समजावून सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ व कायदा सेवा अधिकारी कायदा याबद्दल प्राध्यापक ऍड . पुनम मानकवळे मॅडम यांनी ग्रामस्थांना माहिती दिली , तसेच विद्यार्थ्यांनी घरोघरी ग्रामस्थांना प्रत्यक्षात भेटून माहिती दिली. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनिंग कार्ड, जातीचा दाखला अल्प संख्यांक दाखला, डोमेसिल दाखला इ. कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे प्राप्त करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. अशी कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी शासनाने शासकीय अधिकाऱ्यास किती समय सीमा दिलेली आहे किंवा कागदपत्र प्राप्त करताना अर्ज कसा करायचा, कोठे करायचा व आपल्या अर्जाची दखल घेत नसल्यास काय कार्यवाही करावी लागेल , याविषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिली , तसेच पैसे नसतानाही आपण कोर्टात न्याय कसा मागू शकतो कायद्या मध्ये त्यासाठी काय तरतुदी आहेत , हे ही समजावून सांगितले.

विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ मध्ये विनामूल्य लीगल सर्विस ऑथॉरिटी कशा प्रकारे चालवल्या जातात , याविषयी ग्रामस्थांना माहिती दिली , व या सर्विसचा लाभ घेण्यासाठी आवाहनही केले. प्राध्यापक ऍड. प्रियांका मुरकुटे मॅडम यांनी प्रत्यक्ष ग्रामस्थांची भेट घेऊन माहिती दिली व ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना कायद्याचे मार्गदर्शन करताना व ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेताना खूप शिकायला मिळाले.
- Advertisment -

You cannot copy content of this page