Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकारमेल स्कुलची ५० टक्के फी माफ करा..

कारमेल स्कुलची ५० टक्के फी माफ करा..


कारमेल पालक संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा…अन्यथा आंदोलन..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

खोपोली शहरात असलेल्या कारमेल स्कुलची फी ५० टक्के माफ करावी अशी मागणी कारमेल पालक संघर्ष समितीने शाळेकडे केली.देशावर आलेल्या कोरोना महामारीने संपूर्ण हाहाकार माजवला असून यामुळे देशात लॉकडाऊन केले होते.

यामुळे सगळे उधोग धंदे बंद पडले होते त्यामुळे पालक वर्गासह सगळ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली ती आता पूर्वपदावर येत असताना कारमेल स्कुल ने पालकांना फी भरा असा तगादा लावला,आहे.


तर आम्हाला यावर्षी फी मध्ये सवलत देऊन ५० टक्के फी माफ करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शाळेने पालकांकडे केली, यासाठी पालकांनी शाळेवर मोर्चाही काढला होता मात्र कारमेल व्यवस्थापन या मागणी कडे लक्ष देत नाहीत.


यासाठी कारमेल पालक संघर्ष समिती यांनी आज पत्रकार परिषद घेत कारमेल स्कुलच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढून फी मध्ये सवलत मिळावी अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज पालकांनी शाळेला दिला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page