Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकार्यसम्राट आमदार " महेंद्र शेठ थोरवे " यांच्या विजयात अर्धांगिनी " सौ....

कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या विजयात अर्धांगिनी ” सौ. मीना ताई थोरवे ” यांचा खारीचा वाटा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )अस म्हणतात की , पुरुषाच्या यशामागे ” स्त्री ” चा खूप मोठा वाटा असतो . ती प्रत्यक्ष जरी त्यांच्या सोबत नसली तरी तिची यशाची ” शक्ती ” नेहमीच पुरुषा बरोबर ” सावली ” सारखी असते . प्रसंगी ती ” साध्वी ” बनून परमेश्वर चरणी पूजा – अर्चा – प्रार्थना – उपवास – नवस करून आपल मागणं पूर्ण होवो , अशी विनवणी करते , तर कधी ती ” रण रागिणी ” बनून पुरुषा सोबत त्याच्या खांद्याला खांदा लावून प्रयत्न करून यशाला आपल्याकडे खेचून घेते , तर कधी ती ” माय माऊली ” बनून मायेची तर कधी त्याची ” सावली ” बनून प्रेमाची ढाल बनते . प्रसंगी ती माय – ताय – सावली अश्या सर्व रुपात दिसून मी सुखात – दुःखात तुझ्या सोबतीलाच आहे , हे सांगत असते . असेच काहीसे ” निर्मळ रूप ” कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या अर्धांगिनी , त्यांच्या विजयात यशाची सावली बनलेल्या ” सौ. मीना ताई थोरवे ” या आहेत .

यावेळी विधानसभेची निवडणूक खूपच ” चुरशीची ” झाली . आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना पराभूत करण्यासाठी अनेक ” दृश्य – अदृश्य शक्ती ” आपआपली ” साम – दाम – दंड – भेद ” अश्या राजकीय शस्त्रांचा वापर गनिमी काव्याने करत होते . यासाठी अनेक पक्ष एकत्र आले होते , अनेकांचा ” थेट ” तर काहींचा ” छुपा ” पाठिंबा होता . गल्ली पासून दिल्ली पर्यंत सूत्र हालत होते . अशा नाजूक व धीर गंभीर परिस्थितीत आरोपांच्या फैरी झडत होत्या . प्रत्येकाला ” तोलल ” जात होत . ” विकास व निधीची ” लक्तरे निघत होती . मात्र अश्या परिस्थितीत शहरा पासून ग्रामीण भागातील प्रत्येक घरात जाऊन आपल्या ” साहेबांनी ” केलेले विकास कार्य , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना , महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवून जल जीवन मिशन द्वारे सर्वत्र केलेली पिण्याच्या पाण्याची टंचाई वर मात , दळण वळणाचा मार्ग मोकळा करून केलेले रस्त्यांचे जाळे , कर्जत शहरातील ऐतिहासिक कामे , श्री विठू रायांची भव्य मूर्ती , श्री संभाजी महाराज यांचे स्मारक , शिव सृष्टी , बैठकीचे जनक डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार , भजन भूषण गजानन बुवा पाटील यांचे स्मारक , आपल्या संकल्पनेतून असे एक ना अनेक विकास कामातून प्रज्वलित झालेले ” विकास पुरुष ” म्हणून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा महिमा त्यांची सावली सौ. मीना ताई थोरवे मतदार राजा , बंधू भगिनी यांना रणरणत्या उन्हात पायी फिरून ईव्हीएम मशीनच्या १ नंबर वर असलेले महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या नावा समोरील ” धनुष्य बाणाचे ” बटण दाबून आपले बहुमूल्य मत द्या, असे सांगत मूर्तरूप देत होत्या .

अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सौ. मीना ताई थोरवे यांनी प्रचाराचा धुरळा उडवत महायुतीचे पदाधिकारी , कार्यकर्ते , महिला आघाडी , शिवसेनेचे शिव सैनिक , आपले कुटुंबातील सदस्य , यांच्या सोबत राहून प्रचाराचे ” शिव धनुष्य ” पेलले व २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सौ. मीना ताई थोरवे यांच्या अथक प्रयत्नांना यश आले व कार्यसम्राट लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा विजयी होवून ते पुन्हा दुसऱ्यांदा ” विकास पर्व – २ ” मध्ये जाण्यास सज्ज झाले . या ” विजयी पर्वात ” आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या अर्धांगिनी सौ. मीना ताई थोरवे या यशाच्या ” सावली ” बनल्या , हे निर्विवाद सत्य असून , त्यांचा यांत नक्कीच ” खारीचा वाटा ” आहे , हे म्हणणे वावगे ठरणार नाही .
- Advertisment -

You cannot copy content of this page