if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ-कार्ला दी 13 जुलै 2020 ( प्रतिनिधी गणेश कुंभार) मावळ तालुक्यात कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेशिवाय बाकीचे सर्व व्यवहार कार्ला फाटा येथे 11 जुलै ते 20 जुलै दहा दिवस बंद तर मळवली येथे 13 जुलै ते 18 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे.कोरोनाचा शिरकाव हा ग्रामीण भागात वेगाने पसरत असताना बंद निर्णय ग्रामपंचायत घेतला .
वेहरगाव, शीलाटने, मळवली,येथे कोरोना पाॅझीटीव रूग्ण आढळून आले आहेत.टाकवे येथील रूग्णाचे कार्ला फाटा येथे भाजीचे दुकान असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कार्ला ग्रामपंचायतीने व मळवली परीसरात सुद्धा एक रूग्ण आढळून आल्याने मळवली ग्रामपंचायतीने बाजारपेठ बंद केली असून फक्त अत्यावश्यक सेवेतील मेडिकल सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून कार्ला ग्रामपंचायत सरपंच रुपाली हुलावळे ,उपसरपंच अविनाश हुलावळे,पोलीस पाटील संजय जाधव, मळवली चे सरपंच सुनंदा गोर्हे , उपसरपंच प्रीयंका जीर, तुकाराम ठोसर,अस्लम शेख,पोलीस पाटील शहाजान इनामदार,ग्रामसेवक सुभाष धोत्रे,ग्रामपंचायत सदस्य व कार्ला , मळवली शीघ्र व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन आरोग्य वीभाग व ग्रामस्थ यांच्या संगमताने बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे.
कार्ला परिसरात कोणीही विनाकारण फिरू नये असे आव्हान सरपंच रुपाली हुलावळे यांनी केले.परंतु नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मळवली व कार्ला परीसर बंद केला आहे असून काही नागरीक अत्यावश्यक कामांशिवाय रसत्यावर विना मास्क फिरताना दिसुन येत आहे .कोरोना रोग हा कीती भयंकर आहे तरी सुद्धा नागरीक दुर्लक्ष करताना दिसूनयेत आहे.कोरोना रोगापासून जर स्वतःला व आपल्या कुटूंबाला कोरोना संसर्ग होऊ नये . प्रत्येक नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये व (social distancing) आणि मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.सरकारी सूचनांचे खबरदारीने नागिरकांनी पालन केले तर कोरोनाचा संसर्गा पासून वाचू शकतात.