Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकिरवली येथील " सिद्धार्थ छडीपट्टा आखाड्यातील " तरुणाईचा दांडपट्टा फिरला सांताक्रूझ येथे...

किरवली येथील ” सिद्धार्थ छडीपट्टा आखाड्यातील ” तरुणाईचा दांडपट्टा फिरला सांताक्रूझ येथे !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील किरवली येथील ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व किशोर भाई मार्ग येथील सिद्धार्थ छडीपट्टा आखाडा ” हा रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे . कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हि अविस्मरणीय आत्मसंरक्षण असलेली छडीपट्टा कला , एका पिढीकडून – दुसऱ्या पिढीने आत्मसात केली असून किरवली येथील तरुणाई चालवत असलेली छडीपट्टा – लाठी काठी – तलवारबाजी – हि अविस्मरणीय कला वाखाणण्याजोगी असून याचे प्रदर्शन या तरुणाईने ” तरुण मनाचा क्रांतिकारी हुंकार ” असलेल्या प्रबोधन युवा संघ – सांताक्रुज महा महोत्सवात प्रबोधन युवा संघ आणि तलाई स्पोर्ट्स क्लब , कालीना – सांताक्रुज पूर्व येथे आयोजित दिग्वियी नेते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्त क्रांतिकारकांच्या संयुक्त जयंती महोत्सवात सहभागी झाले होते.

” सिद्धार्थ छडीपट्टा आखाडा ” – किरवली यांचे हे अविस्मरणीय आत्मसंरक्षण कलेचे प्रात्येक्षित बघून भारावलेले ” प्रबोधन युवा संघ आणि तलाई स्पोर्ट्स क्लब , कालीना – सांताक्रुज पूर्व , येथील जात – धर्म – पंथ – लिंग – रंग या सर्व भेदा पासून मुक्त होऊन , चला माणूस होऊ या – चला माणूस होऊ या , हे ध्येय उराशी बाळगून कार्य करणारे अध्यक्ष नितेश शिंदे , व महासचिव अभिषेक गायकवाड तसेच येथील सांताक्रूझ रहिवासी यांनी ” सिद्धार्थ छडीपट्टा आखाड्यातील ” तरुणाईला गौरविण्यात आले.
महापुरुषांच्या जयंती महोत्सवात सामील होऊन , समाजात बदल घडवून आणण्यासाठी , घेतलेल्या मेहनतीच्या ऐवजात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह व गौरव प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले .यावेळी सिद्धार्थ छडीपट्टा आखाडा किरवली – कर्जत येथील दिलीप गायकवाड , दांडपट्टा वस्ताद तथा आरपीआय कर्जत ता. अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , उमेश भालेराव , सुरज गायकवाड , निखिल गायकवाड , सुशांत भालेराव , गौरव गायकवाड , विकेश गायकवाड , सिद्धार्थ गायकवाड , कल्पेश गायकवाड , सिद्धांत गायकवाड , तुषार गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page