Monday, November 25, 2024
Homeपुणेलोणावळाकुसगांव टोल प्लाझा जवळील इमारतीत ट्रामा केअर सेंटर उभारावा, श्रीधर...

कुसगांव टोल प्लाझा जवळील इमारतीत ट्रामा केअर सेंटर उभारावा, श्रीधर पुजारी यांची मागणी..

लोणावळा (प्रतिनिधी) : पुणे – मुंबई मार्गावरील अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार व्हावेत तसेच त्यांचे प्राण वाचावेत यासाठी लोणावळ्यातील वलवण येथे असलेल्या कुसगाव टोलनाक्याजवळील जागेत ट्रामा केअर सेंटर उभारावे , अशी मागणी लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात द्रुतगती मार्गावर शिवसंग्राम संघटनेचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला . अपघातानंतर सुमारे तासभर त्यांना तातडीची मदत मिळाली नसल्याचा आरोप होत आहे . या पार्श्वभूमीवर द्रुतगती मार्गावरील अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . द्रुतगती मार्गावर अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे . रस्ते विकास महामंडळाच्यावतीने मार्ग सुरक्षित करण्यात येत आहे . सध्या बोरघाटात द्रुतगती मार्ग रुंदीकरण , दुरुस्तीसह मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू आहे . त्यामुळेही अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

अपघातांमधील जखमींना वेळेमध्ये योग्य उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो . अपघात झाल्यास रुग्णांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालय , सोमाटणे किंवा निगडी येथील खासगी रुग्णालयांचा पर्याय होता . ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर ही कार्यान्वित होत आहे . मात्र , अपघातानंतर दिरंगाई झाली तर रुग्णाचा जीव जाण्याचीही भीती आहे . त्यामुळे जखमींवर वेळीच उपचार होण्याची गरज आहे.

लोणावळ्यात रुग्णालयाची उभारणी लवकरात लवकर करण्यात येत असल्याचे श्री . पुजारी म्हणाले . वलवण येथील द्रुतगती मार्गावरील कुसगाव टोलनाक्यावरील रस्ते विकास महामंडळाची वास्तू अनेक वर्षापासून धूळखात पडून आहे . प्रशस्त आणि मार्गालगत असल्याने या वास्तूचा सोईस्कर वापर होऊ शकतो.यावर्षी पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर 104 अपघातांमध्ये 40 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे . 65 जण गंभीर तर 14 जण किरकोळ जखमी झाले आहेत . हजारो नागरिकांना या मार्गावर केवळ वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे . हे प्रकार रोखण्यासाठी मध्यवर्ती असल्याला लोणावळा शहरामध्ये ट्रामा केअर सेंटर होणे गरजेचे आहे , असे मत पुजारी यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page