Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रकृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ घ्या, कृषी अधिकारी उज्वला वानखेडे…

कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ घ्या, कृषी अधिकारी उज्वला वानखेडे…

अलिबाग (प्रतिनिधी):केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या कृषी खात्याच्या विविध योजनांना अनुदान मिळत असून त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती करावी. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन केल्याने आपल्या गावातील परिसरातील. नागरिकांना. गावात घरात काम मिळेल असे आवाहन सागरगड शेतकरी महासंघाच्या उद्घाटन कार्यक्रमात रायगड जिल्हा कृषी अधिकारी श्रीमती उज्वला वानखेडे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा कृषी अधिकारी उज्वला वानखेडे. आचार्य भगवती नंदागिरी मंडलेश्वर,ऍड.गोपाळ शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड भूषण जयपाल पाटील, सन्माननीय पाहुणे म्हणून आशा तज्ञ सुनील प्रधान, लायन्स क्लब पोयनाड अध्यक्ष प्रमोद राऊत,डॉक्टर निलेश म्हात्रे, रोटरी क्लब अलिबाग अध्यक्ष शिशोअर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. तर पाहुण्यांचे स्वागत श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन महासंघाच्या पदाधिकारी यांनी केले.प्रारंभी ऍड.गोपाल शेळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रमी जीवनचरित्र व त्या काळातील शेतकऱ्यांची प्रगती,नियम,वृक्ष व वृक्षलागवडीच्या कायद्याची माहिती त्यांनी दिली.सुनील प्रधान यांनी आपल्या शेतात पिकवली जाणारी विविध फळे शेजारील जंगलात येणारी फळे दीर्घकाळ साठवणुकीसाठी त्यावर प्रक्रिया करून आपले उत्पन्न कसे वाढवायचे याची माहिती दिली.तसेच आचार्य नंदागिरी मंडलेश्वर यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गाय अथवा म्हैस ठेवावी ज्यामुळे सेंद्रिय खत, दूध, तूप, शेणापासून घरामध्ये गोबर गॅस व गोवऱ्यांचे उत्पन्न कसे मिळवायचे याचे मार्गदर्शन आपल्या भाषणातून केले.त्यांची स्वतःची फार मोठी गोशाळा असुन त्याची माहिती देऊन. शेतकऱ्यांनी आपली कंपनी स्थापन करावी ते करून देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.
यावेळी उज्वला वानखेडे म्हणाल्या रायगडातील शेतकरी अतिशय कष्टाळू असल्याचे पाहिले असून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या 15 कंपन्या रजिस्ट्रेशन केल्या आहेत.खालापूर तालुक्यातील एक कंपनी अतिशय प्रगतीपथावर आहे.कृषी विभागाची आत्म संघटना अतिशय उत्तम प्रकारे कार्य करीत असून आपल्याही विभागात आत्म स्थापन करा. रायगड जिल्हा पर्यटनात प्रगतीपथावर असल्याने आपण सेंद्रिय खतावर पिकवलेली फळे आणि भाजीपाल्याला फार मोठी मागणी आहे.यासाठी प्रक्रिया उद्योगात लक्ष घालावे.यावेळी उपस्थितांना आपले अनुभव अशोक पाटील प्रगतिशील शेतकरी भाजीपाला उत्पादक कर्जत डॉक्टर बकुळ पाटील यांनी आपले अनुभव कथन केले.
त्याचबरोबर यावेळी शेतकरी दिनानिमित्त नागझरी येथील महिला शेतकरी भाजीपाला उत्पादक सौ.शोभा पाटील,वडवली येथील श्रीमती ममता पाटील,श्रीगांव सौ. मधुरा म्हात्रे,बिडवागळे सौ. माधुरी पाटील,कुसुंबळे सौ.सुनीता भोईर, खरोशी सौ नमिता पाटील दळवी, पोयनाड श्रीमती भारती तावडे यांचा नारळाचे रोप साडी चोळी व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तर जयपाल पाटील,आचार्य नंदागिरी पोयनाड येथे रायगड शेतकरी महासंघाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून प्रगतिशील शेतकरी रायगड भूषण जयपाल पाटील, आचार्य भगवती नंदागिरी मंडलेश्वर, उद्योजक विवेक पाटील,डॉक्टर निलेश म्हात्रे यांचाही उज्वला वानखेडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना जयपाल पाटील यांनी आपल्या शेतावरील प्रत्येक जागेत झाडे लावा आणि जगवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ अवश्य घ्या कृषी अधिकाऱ्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटा,आपल्या काही अडचणी असतील तर त्यांना सांगा त्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक शेती अभ्यास दौऱ्यात सामील व्हा आणि आपली आर्थिक उन्नती करा असे बोलताना म्हणाले त्याचबरोबर आपल्या सुरक्षेसाठी पायात कायम साप,विंचु साठी गमबुटाचा वापर करा, वीज केव्हाही कोसळू शकते यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या दामिनी ॲपचा वापर करा, आपण सुरक्षित तर घर सुरक्षित हे कायम लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने इस्रायल अभ्यास दौऱ्याला पाठविल्याने पाणी वाचवा ही मोहीम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत असल्याचे सांगितले व आपले शेतीच्या प्रयोगांबद्दल माहिती दिली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर गड महासंघाचे अध्यक्ष विजय चवरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव रोहीत पाटील यांनी केले डॉक्टर अरुंधती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार मोहन पाटील,प्रसन्ना चवरकर, निखिल मोकल,संकेत चवरकर यांनी विशेष प्रयत्न केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page