Thursday, December 26, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडकोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे…..उपमहापौर तुषार हिंगे

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे…..उपमहापौर तुषार हिंगे

पिंपरी (दि. 20 जुलै 2020) कोरोना कोविड -19 या संसर्गजन्य आजाराची देशामध्ये लाखो नागरिकांना बाधा झाली आहे. महाराष्ट्रात मार्च महिन्यात सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहरात कोविड -19 चे रुग्ण आढळले. सद्य परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरात 3200 हून जास्त रुग्ण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व इतर रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांना उपचार व सेवा सुविधा देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाबरोबर ‘आपली सखी’ सारख्या इतर सामाजिक संस्थांनी देखील स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी केले.


शहरातील ‘आपली सखी’ या सामाजिक संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कोविड -19 च्या महिल्यांच्या वॉर्डसाठी स्वच्छतागृहाचे साहित्य आपली सखीच्या अध्यक्षा संगिता तरडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे उपमहापौर तुषार हिंगे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे उपस्थित होते.


उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले की, कोविड -19 या जागतिक महामारीचा सामना करीत असताना आगामी काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरुन वायसीएम रुग्णालय कोविड -19 साठी समर्पित करण्यात आले. दाखल रुग्णांना आवश्यक असणा-या सेवा सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. प्रशासनाबरोबरच शहरातील सामाजिक संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट, उद्योजकांनी रुग्णांना सुविधा देण्यासाठी आर्थिक किंवा वस्तू स्वरुपात मदत करुन सहभागी व्हावे. प्रशासनाबरोबरच इतर सर्वांच्या सहभागाने आपण कोविड -19 या जागतिक संसर्गजन्य महामारीवर निश्चितच विजय मिळवू असे तुषार हिंगे म्हणाले.

- Advertisment -

You cannot copy content of this page