मावळ दि.31: संपूर्ण मावळ तालुक्यात आज बजाज विशेष लसीकरण मोहीम जिल्हा परिषद पुणे व बजाज कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. नागरिकांनी सदर लसीकरणास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी तीन वाजेपर्यंत बजाज कंपनीद्वारे प्राप्त लस अपुरी पडल्याने पुन्हा जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत देखील नवीन शासकीय लस प्राप्त झाली.
त्यामुळे तालुक्यातील एकूण 57 केंद्रात संध्याकाळी 07 पर्यंत 17422 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. सकाळी आठ वाजता सुरू झालेले लसीकरण संध्याकाळी सात नंतरही सुरू होते.
सदर लसीकरण मोहिमेस आमदार सुनिल अण्णा शेळके,कृषी पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद पुणे बाबुराव आप्पा वायकर ,पंचायत समिती सभापती ज्योतीताई शिंदे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आयुष प्रसाद,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, माजी पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी पंचायत समिती उपसभापती शांताराम कदम यांनी सर्वत्र भेटी देऊन लसीकरण केंद्रांची पाहणी केली.
सदर लसीकरणात मावळात एका दिवसात एकूण 17422 इतके विक्रमी लसीकरण करण्यात आले असून केंद्रनिहाय लसीकरण पुढीलप्रमाणे ::
1) ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे ::
अंतर्गत केंद्र 01 ::
एकुण लसीकरण :: 679
2) उपजिल्हा रुग्णालय लोणावळा
अंतर्गत केंद्र 14::
एकुण लसीकरण :: 5078
3) प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे
अंतर्गत केंद्र :: 07
एकुण लसीकरण :: 3135
4) प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे बुद्रुक
अंतर्गत केंद्र :: 05
एकुण लसीकरण :: 1312
5) प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा
अंतर्गत केंद्र :: 14
एकुण लसीकरण :: 2910
6) प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला
अंतर्गत केंद्र :: 05
एकुण लसीकरण :: 1884
7) प्राथमिक आरोग्य केंद्र आढले
अंतर्गत केंद्र :: 07
एकुण लसीकरण ::1482
8) प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे
अंतर्गत केंद्र :: 04
एकुण लसीकरण ::942….