Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळक्रशर व्यावसायिकांकडून बाळा भेगडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, आमदार सुनील शेळके...

क्रशर व्यावसायिकांकडून बाळा भेगडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, आमदार सुनील शेळके…

मावळ (प्रतिनिधी): माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळातील गौण खनिज व्यावसायिक अवैध उत्तखनन करीत असून त्यांच्या विरोधात हरित लवादात तक्रार दाखल केली असल्याने क्रशर व्यावसायिकांकडून माझ्या जीवाला धोका असून सुरक्षा वाढविण्याबाबतचे पत्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तानां दिले आहे. तर बाळा भेगडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे वक्तव्य आमदार सुनिल शेळके यांनी एका प्रसिद्धी पत्रका मार्फत केले आहे.
तसेच क्रशर व्यावसायिक हे गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय अटी शर्तीनुसार व नियमांच्या अधीन राहूनच व्यवसाय करीत आहेत. आणि आपण मागील दहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत होता . परंतु त्यावेळी कोणी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचे तुम्हाला आढळले नाही. मग आता राज्यातील झालेल्या सत्तांतरानंतर अचानक हे व्यावसायिक अवैधरित्या व्यवसाय करीत असल्याचा दृष्टांत तुम्हांला कसा काय झाला. स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याकरिता व चर्चेत राहण्याकरीता सुरू असलेला हा खटाटोप तर नाही ना. असा प्रश्न उपस्थित करत,राजकीय हव्यासापोटी पुणे जिल्ह्यातील क्रशर व्यावसायिकांना माफिया हा शब्द वापरणे योग्य नाही.
क्रशर व्यावसायिक हे माफिया नसून कायदेशीरपणे शासकीय नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करणारे स्थानिकच असून तुमच्या जीवाला कुठलाही धोका असणार नाही व तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. असे वक्तव्य आमदार शेळके यांनी केले, तसेच असे पत्रव्यवहार करून क्रशर व्यवसायिकांची बदनामी करु नये . करोडो रुपयांचे कर्ज घेऊन पुणे जिल्ह्यात क्रशर व्यवसाय करणारे स्थानिक भूमिपुत्र असुन गुन्हेगार नाहीत , याचे भान असायला हवे.स्थानिक व्यावसायिकांवर असे आरोप करताना त्यांनी विचार करायला हवा होता असेही या पत्रकात आमदार शेळके यांनी म्हटले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page