Thursday, September 19, 2024
Homeपुणेलोणावळाखंडाळा प्रीमियर लीग सीजन बॉल क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरला "सम्राट स्पोर्ट्स फौंडेशन...

खंडाळा प्रीमियर लीग सीजन बॉल क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरला “सम्राट स्पोर्ट्स फौंडेशन “संघ..

लोणावळा (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष विनोद होगले आणि सागर चौधरी आयोजित “खंडाळा प्रीमियर लीग ” या भव्य सीजन बॉल क्रिकेट स्पर्धेचा फायनल विजेता ठरला “सम्राट स्पोर्ट्स फौंडेशन” संघ. कार्ला गावचे उद्योजक संजय मोरे यांच्या मालकीचा हा संघ आहे.
लोणावळा रेल्वे ग्राउंड येथे सलग तीन दिवस ही सीजन बॉल क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात आली. या स्पर्धेत लोणावळा खंडाळा मर्यादित चार संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये अंतिम सामन्यात उद्योजक संजय मोरे यांच्या मालकीचा “सम्राट स्पोर्ट्स फौंडेशन” हा संघ विरुद्ध “दत्ता दळवी ग्रुप ” ह्या दोन संघांमध्ये चुरशीची लढत झाली. यामध्ये सम्राट स्पोर्ट्स फौंडेशन संघाने डी डी ग्रुप या संघासमोर 20 षटकांत 166 धावांचे आवाहन डी डी ग्रुप संघाला दिले होते. परंतु सम्राट स्पोर्ट्स फौंडेशन संघाच्या तुफान गोलंदाजांपुढे डी डी ग्रुपचे फलंदाज यांचा निभाव लागला नाही. अवघ्या 80 धावांनी सर्व गडी बाद असा विजय प्राप्त केला. आयोजकांकडून सर्व प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच सलग तीन दिवस सुरु असणाऱ्या या स्पर्धेत आपले कला कौशल्य दाखविणाऱ्या वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्तम फलंदाज – आनंद भोईटे, उत्तम गोलंदाज – हमजा फारुकी, उत्तम क्षेत्र रक्षण – साहिल चव्हाण,मालिकावीर – राजुद्दिन शेख अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.
सदर स्पर्धा ही व्यवस्थितपणे पार पडावी यासाठी पंच म्हणून देवेंद्र मळेकर व साहिल कुंभार यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धेसाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणारा व प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी समालोचक म्हणून व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड घोषित अतिश नरवाल यांनी उत्तेजनार्थ काम पाहिले. त्याचबरोबर सलग तीन दिवस बिनचूक धाव संख्या व मॅचचा स्कोरर म्हणून राधेश्याम केशव यांनी प्रामुख्याने आपली भूमिका पार पाडली तर सलग तीन दिवस खेळ पट्टी मेंटेनन्सचे काम फ्रँसीस यांनी उत्तम पार पाडले.
अगदी खेळीमेळीच्या वातावरणात खंडाळा प्रीमियर लीग या स्पर्धेचे पहिले पर्व पार पडले. यावेळी अंतिम सामन्यात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच पारितोषिके वितरण करण्यासाठी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विनोद होगले,जेष्ठ कार्यकर्ते नारायण पाळेकर,मा. नगरसेवक निखिल कवीश्वर,राजू बोराटी, भालचंद्र खराडे, यशवंत पायगुडे,महिला प्रदेश सचिव मंजुश्री वाघ,संतोष कचरे,धवल चौहान,अजिंक्य कुटे,आदिल शेख यांसह अन्य मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page