आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन संपन्न..
खोपोली( दत्तात्रय शेडगे)
मुंबईतील दिवा कोळीवाडा येथे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद चे आमदार रमेश दादा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून खाडीकिनारी बांधण्यात आलेल्या निवारा शेड चे उदघाटन महाराष्ट्र राज्य भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष तथा कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष अँड. चेतन दादा पाटील यांच्या शुभहस्ते व दिवा गावचे प्रथम सरपंच वाय. डी. पाटील, माजी नगरसेवक जी. एस .पाटील, विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष अरुण पाटील, मोरेश्वर केनी यांनीश्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणच्या स्थानिक मच्छीमारांना व ग्रामस्थांना अनेक समस्या भेडसावत होत्या. तसेच विविध उपक्रमांसाठी व कार्यक्रमासाठी कोणतीही सोय या ठिकाणी उपलब्ध नव्हती परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते .त्यामुळे दिवा येथील कोळी मच्छिमार बांधवांनी व ग्रामस्थांनी सदर ठिकाणी मच्छिमारांसाठी निवारा शेड बांधण्याची मागणी केली होती.
आमदार रमेश दादा पाटील यांनी स्थानिक भूमिपुत्रांना कडून वारंवार होणारे या मागणीचा विचार करून व कोळी मच्छिमारांच्या विषयी असणाऱ्या संवेदनशीलतेने मधून दिवा कोळीवाडा येथील खाडीकिनारी मच्छीमारांना निवारा शेड बांधण्यासाठी आपल्या स्थानिक विकास आमदार निधीमधून लाखो रुपये निधी उपलब्ध करून दिला व ते काम पूर्णत्वास केले. या वेळी माजी नगरसेवक जी.एस पाटील यांनी आमदार रमेश दादा पाटील यांनी आमदार नसतानासुद्धा आपल्या गावच्या मंदिरासाठी मोठी आर्थिक मदत केली होती असे सांगितले.
आज त्यांनी आपल्या आमदार निधीतून ग्रामस्थांच्या विविध उपक्रमासाठी निवारा शेड बांधले आहे व ते यापुढेही आमच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील अशा भावना व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे सौ. प्रमिला पाटील यांनी ऐरोली जकात नाका येथील मच्छी मार्केट लवकर बंद करावे. तसेच नवी मुंबई शहरात मासे विक्री करणाऱ्या मच्छी विक्रेत्या महिलांना आपल्या माध्यमातून परवाने मिळवून देण्यात यावेत अशी विनंती केली.
यावेळी अँड .चेतन दादा पाटील यांनी कोळी मच्छीमार बांधवांच्या व स्थानिक भूमिपुत्र यांच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन देऊन या निवारा शेड जवळ शौचालयाची सोय उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली.
तसेच मच्छिमार बांधवांसाठी अजून यापुढेही काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्र व कोळी बांधवांच्या उन्नतीसाठी व उत्कर्षासाठी कोळी महासंघ व भाजपा मच्छीमार सेलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील जकात नाका येथील मच्छी मार्केट तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झाले असून ते लवकर त्या ठिकाणाहून स्थलांतरित होईल.
त्याच प्रमाणे मच्छी विक्रेत्या महिलांना परवाने मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून लवकरच महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन या ठिकाणी बैठक आयोजित करू त्याचबरोबर नवी मुंबईतील मच्छिमार बांधवांना प्रधानमंत्री मस्तसंपदा या योजने मार्फत विविध योजना व बोटी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे अँड.चेतन दादा पाटील यांनी सांगितले.त्याचप्रसंगी मच्छीमार नेते श्री चंदन मढवी, मोरेश्वर केनी ,श्री अरुण पाटील प्रकाश मढवी, बाळकृष्ण मढवी ,नारायण मुकादम श्री .निकेतन पाटील इतर मान्यवर तसेच कोळी बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.