Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर पोलिस स्टेशनच्या वतीने तृतीयपंथीना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

खालापूर पोलिस स्टेशनच्या वतीने तृतीयपंथीना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

खोपोली (दत्तात्रय शेडगे)काही ठिकाणी तृतीयपंथी समुदायाच्या बाबतीत पाहिले तर संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर खायचं काय हा प्रश्न या समुदायासमोर उभा राहिला आहे. बहुतांश तृतीयपंथी समुदायाचे उदरनिर्वाहाचे साधन हे बाजार मागणेच आहे. बाजार मागून घरी गेल्याशिवाय दूसरा पर्याय नाही.

मुळातच काही बेघर म्हणून जगत असतांना जिथे राहण्यासाठी शाश्वत छप्परच नाही तिथे जीवनमानाचा प्रश्न आणि जगण्याची लढाई कोरोना लॉकडाऊन अजून तीव्रतीचे बनली असताना खालापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तृतीयपंथीच्या मदतीला धावून खालापूर पोलिस ठाणे असून 10 मे रोजी खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते, उपपोलिस निरिक्षक स्वप्निल सावंतदेसाई आणि टीमच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वाटप केल्याने तृतीयपंथी बांधवांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाले उपस्थित तृतीयपंथी बांधवांनी खालापूर पोलिस ठाणे प्रशासनाचे आभार मानले.


जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेलं असताना हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना या सर्व परिस्थितीत अनेक आव्हांनाना तोंड द्यावे लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन असंख्य सामाजिक कार्यकर्ते – संस्था – मंडळे, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, सरकारी यंत्रणा, पोलिस प्रशासनाने मदतीचा हात देत गोरगरीबांना जगण्याची उमेदी दिली.

परंतु काही हातावर पोट असणारे काही बांधव या मदतीपासून वंचित असताना खालापूर पोलिस ठाणे प्रशासनाने यांचे गांभीर्य घेत खालापूर पोलिस ठाणे हद्दीतील तृतीयपंथी समाजाला मदतीचा हात दिल्याने तृतीयपंथी बांधवाच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान पाहायला मिळाल्याने सर्व उपस्थित तृतीयपंथी बांधवांनी खालापूर पोलिस ठाणे प्रशासनाचे आभार मानले असून यावेळी पोलिस ठाण्याच्या वतीने तृतीयपंथी बांधवाना अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.तर यावेळी निरिक्षक अनिल विभूते, उपपोलिस निरिक्षक स्वप्निल सावंतदेसाई आदीसह पोलिस अधिकारी – कर्मचारी व तृतीयपंथीय बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page