प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खोपोली दि.14: खोपोलीतील मालती अपार्टमेंटच्या पार्किंग मधील दुचाकीना भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.6 दुचाकी आणि 3 सायकल जळून खाक काटरंग येथील चिन्मय नगर मधील मालती अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांना अचानक आग लागली असून या आगीत 3 स्कुटी, 3 बाईक आणि 3 सायकल, जळून खाक झाल्या.
या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शीने पाहताच अपघात ग्रस्तचे सदस्य आणि फायर ब्रिगेड यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझविण्याचे शर्थीने प्रयत्न केले, तर खोपोली पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेचा पुढील तपास करीत आहेत.