if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : एमडी ड्रग्स व गांजा व्यवसाय करणाऱ्या एका फरारी आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे.राकेश उर्फ डॅनी रविंद्र हान्सारे (रा कैलासनगर, लोणावळा, ता मावळ, जि पुणे) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून गुन्हा रजिस्टर कलम- 323/2024 एनडीपीएस 21 (ब), 8 (क) या अंतर्गत पोलिसांना तो हवा होता.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मावळ राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पो. नि. सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. संतोष जाधव, पो.उप.नि. अभिजित सावंत, पो. हवा. राहुल पवार, पो. शि. नामदास, रईस मुलाणी, रमेश उगले यांनी सदरची कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना राकेश उर्फ डॅनी रविंद्र हान्सारे हा आरोपी वलवन डबल गेट याठिकाणी आलेला आहे अशी खात्रीलायक माहीती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. यानंतर त्यास पुढील तपास कामी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.