if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव – गुंडगे रस्त्यावरील उद्यम नगर परिसरात असलेल्या समस्या आत्ता येथील नागरिकांना ” जीवघेण्या ” होत असून याकडे येथील लोकप्रतिनिधी यांनी वेळीच लक्ष दिले नसल्याने येथील समस्या ” जैसे थे ” राहिल्या आहेत , नागरिकांच्या या समस्या जाणून घेवून लवकरच या समस्या सोडविण्यात येतील , असे आश्वासन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी येथील रहिवाशांची चर्चा करून शब्द दिला आहे .
गुंडगे रोड व भिसेगाव एंड असलेल्या या उद्यम नगर मध्ये गेली कित्येक वर्ष पाण्याच्या भीषण टंचाईला येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
कमी व्यासाची पाईप लाईन असल्याने या परिसरात मुबलक पाणी मिळत नाही , तर अर्धवट रस्ता व्यवस्थित तर अर्धा रस्त्याची दयनीय अवस्था आहे , हा रस्ता होण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत लक्षच दिले नसल्याचे दिसून येथे , त्यामुळे पावसात येथे पूरसदृश्य परिस्थिती असते . कर्जत शहर सुशोभीकरणासाठी वाटचाल करत असताना येथे अत्याधुनिक विजेचे पोल देखील टाकले नसल्याने येथे परिसरात अंधाराचे साम्राज्य असते . अश्या अनेक गंभीर समस्येमुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून याचा परिणाम येथील इमारत बांधकाम उद्योगावर होत आहे , तर अनेक नागरिक येथील घारे सोडून जात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
आज कर्जत शहरातील भिसेगाव – गुंडगे विभागातील उद्यम नगर येथील शिवसाई रेसिडेन्सी या सोसायटीतील रहिवाशांच्या व येथील परिसरातील नागरिकांच्या अनेक महत्त्वाच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी आपल्या समस्या १५ दिवसांमध्ये सोडवण्यात येतील असा शब्द उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी दिला . यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या समवेत शहर प्रमुख निलेश घरत , सहसंपर्कप्रमुख विनोद पांडे , जैष्ट शिवसैनिक पंढरीनाथ राऊत , उपशहरप्रमुख कृष्णा जाधव , भिसेगाव शाखाप्रमुख जगदीश दिसले , युवासेना विधानसभा सचिव संपद हाडप , सचिन दगडे , तसेच युवासेना कॉलेजकक्ष कर्जत खालापूर विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड , कॉलेजकक्ष कर्जत समन्वय अविनाश शिर्के , वैभव भोईर , रहिवासी भागवत ठाकरे व अन्य रहिवासी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.