if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” अमूल्य कार्य – नेक विचार , समाज कार्याची आवड – गोरगरिबांचा आधार ” , अशी ओळख असलेल्या कर्जत तालुक्यातील व कर्जत शहरात राहून ” अस्सीम मदतरुपी प्रेम ” सर्वाँना वाटणारा , सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेले नेतृत्व म्हणजे ” शिवभक्त नदीम भाई युसुफ खान ” आज कर्जतच्या राजकीय पटलावर ” लखलखता तारा ” असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली नदीम भाईं अहोरात्र आपल्या ” महेंद्र गड ” या संपर्क कार्यालयातून कामकाज करत असताना कर्जतमध्ये उरूस असो , की रोझे , ईद , मोहरम त्याचप्रमाणे गणपती उत्सव , माघी गणेश उत्सव , गोकुळाष्टमी , नवरात्र उत्सव , होळी , हिन्दू धर्मातील प्रत्तेक सणात – उत्सवात हिरीरीने भाग घेत आहेत . महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची जयंती दिन उत्साहात साजरा करत असतात . नुर ए ईलाही यंग कमिटी – खाटीक आळी , साई मित्र मंडळ , माघी गणेशोत्सव मंडळ , पाटील आळी मित्र मंडळ , धापया देवस्थान समिती , मच्छी मटण मार्केट मित्र मंडळ , सय्यद इशुब शाह बाबा दरगाह कमिटी , कर्जत मस्जिद कमिटी , चार चाकी वाहन चालक मालक संघटना या सर्व क्षेत्रात काम करताना मनात सर्वधर्म समभावाची भावना , जाती विरहित , कार्य करताना उराशी स्वर्गीय गुरुवर्य ” धर्मवीर आनंद दिघे साहेब ” यांच्या विचाराने प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार ते पुढे घेऊन चालले आहेत , ते मुस्लिम समाजाचे असताना देखील हे त्यांचे कार्य कर्जतमध्ये वाखाणण्याजोगे असून ह्या शिवसेनेच्या ” भगव्या शिलेदाराच्या ” पाठीवर पक्षाचे आधारस्तंभ कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा हात असल्याने हिच त्यांना ” ऊर्जा ” मिळत आहे.
अनेक तरुण वर्गाची ” फौज ” त्यांच्या पाठीशी असताना त्यांच्या प्रयत्नाने दर्गाह रस्ता, नदी काठी गार्डन , बोहरी समाजाचे विकास कामांना आणलेला लाखो रुपयांचा निधी हे कार्य त्यांचे वाखानण्या जोगे आहे . अश्या उमद्या – तरुण – होतकरू – मदतीला धावणा-या , रात्री – बेरात्री सर्वांना उपयोगी पडणाऱ्या त्याचप्रमाणे सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक – राजकीय , सांस्कृतिक क्षेत्राची आवड असणाऱ्या नदीम भाई युसूफ खान यांना मुस्लिम समाजातर्फे शिवसेनेने अधिकृत उमेदवारी कर्जत न.प.च्या सन २०२४ च्या निवडणुकीत दिल्यास निश्चितच त्यांचा विजय होईल , हि काळ्या दगडावरची रेघ म्हणावी लागेल . नदीम युसूफ खान यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने नक्कीच ते विजय प्राप्त करू शकतात , हेच त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यावरून दिसत आहे . त्यांच्या रूपाने मुस्लिम समाजाला पालीकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल , व आत्तापर्यंतची उणीव ते भरून काढतील ,यात शंकाच नसेल.
आजच्या तरुण फळीत शिवसेनेमधून कर्जत शहर संघटक नदीमभाई युसूफ खान हा तरुण चेहरा सतत सर्वांच्या व मुस्लिम समाजातील नेतृत्वाच्या रूपाने डोळ्यासमोर आहे . ” हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ” यांच्या धगधगत्या विचारांच्या अग्निकुंडात झळाळून निघालेले त्यांचे कार्य ” ध्येयवेड्यासारखे ” चमकत आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांचे ” सर्वधर्म समभाव हे स्फूर्तिदायक प्रेरणादायी विचार ” घेऊन नदीम भाई समाजात काम करत आहेत.
लहानपणापासून कर्जतचा ” ढाण्या वाघ ” म्हणून संबोधले जाणारे , प्रेमळ व सर्वांनाच मदतीचा हात देऊन जनमाणसात आदरयुक्त दबदबा असणारे ” स्वर्गीय अनंत काका जोशी ” यांच्या मुशीत वाढणारे , शिवसेनाच माझी जात – धर्म असे मानणारे शिवभक्त नदीम भाई युसूफ खान मुस्लिम , बौद्ध , हिंदू , जैन समाज तसेच इतर समाजाच्या प्रत्तेक कार्यक्रमात ते अग्रेसर रहात असून कर्जतमध्ये शांतता अबाधित राहावी म्हणून कर्जत पोलीस ठाण्यात शांतता – मोहल्ला कमिटीच्या बैठकीत ते प्रामुख्याने हजर असतात. कुठे कुणाचा अपघात झाला तर ते मानवतेच्या दृष्टीने तातडीने उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतात , कुणाची समस्या असल्यास शासकीय कार्यालयात जाऊन लगोलग सोडवितात , कुणाचे दाखले , रेशन कार्डाचे काम , निराधार महिलांसाठी पेन्शनचे काम , जातीचे दाखले , कुणाचे वीज कंपनीत बिलाचे काम , पालीकेतील कुणाची समस्या असो , शैक्षणिक क्षेत्रात तर ते स्वताच्या पैशाने गोरगरीब विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेऊन देतात . गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप , शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेऊन होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देतात , आरोग्य शिबीर , रक्तदान शिबिर , घेऊन देशव्यापी कार्य देखील ते करतात , कोरोना काळात ही त्यांनी गरजू व गोरगरीब कुटुंबांना दैनंदिन लागणारे वस्तू , राशन धान्य , देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले . कोरोना लसीकरण शिबिर भरवून नागरिकांना कोरोना लस देऊन त्यांचे आरोग्य सांभाळले , जेष्ठ नागरिक व जे अंथरुणावर पडून होते अश्या रुग्णांना घरी जाऊन कवच कुंडले रुपी कोरोना लसीकरण करून घेतले , व जीवनदान दिले . कोरोना काळात मास्क वाटप , हात स्वच्छ करण्याचे औषधी साहित्य वाटप , स्वच्छता अभियान अशी कामे त्यांनी पोट – तिडकिने केली . एक बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक – भगवा शिलेदार म्हणून त्यांचे कार्य जोमाने सुरू आहे.
देशाच्या ७७ व्या सुवर्ण महोत्सवी व स्वातंत्र्याच्या दिवशीच त्यांचा जन्म झाला असल्याने ” भगवा शिलेदार नदीमभाई युसूफ खान ” यांच्या १५ ऑगस्ट या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अमूल्य कार्याला सलाम – जय महाराष्ट्र – व लाख लाख शुभेच्छा ! व स्वतंत्र भारताच्या ७७ व्या सुवर्ण महोत्सव दिनाच्या सर्वांना त्यांच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.