Friday, November 22, 2024
Homeक्राईमगोल्ड व्हॅली येथील बंगल्यातून 92 हजाराचा ऐवज लंपास, चोरट्या विरोधात गुन्हा दाखल...

गोल्ड व्हॅली येथील बंगल्यातून 92 हजाराचा ऐवज लंपास, चोरट्या विरोधात गुन्हा दाखल…

लोणावळा(प्रतिनिधी) : रात्रीच्या वेळी बंगल्याच्या गॅलरीतून बेडरूमध्ये दाखल होत अज्ञात इसमाने 92 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि.17/9/2022 रोजी रात्री 9:30 च्या सुमारास न्यू तुंगार्ली, गोल्ड व्हॅली, सेक्टर सी, टिटोस द हेलविव्ह या बंगल्यात घडली.
या प्रकरणी सरवम सौरभ बन्सल ( वय,34, रा. ए 703 मानवस्थळ, मिलिटरी रोड, मरोळ, अंधेरी मुंबई ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.या प्रकरणी अज्ञात इसमा विरोधात भाग 5 गु.र.नं.138/2022 भा. द. वी. कलम 380 प्रमाणे लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.17 रोजी रात्री 9ः15 वा. 9ः22 वा सुमारास गोल्ड व्हॅली सेक्टर सी “टीटोस द हेल्वीव”या बंगल्याच्या पाठीमागील पत्र्यावरून पहिल्याम जल्यावरील बेडरूमच्या गॅलरीचा दरवाजा उघडून कोणीतरी अज्ञात चोरटा वय अंदाजे 25 ते 30 वर्षे रेनेकोट घातलेला व तोंडावर मास्क लावलेला अशा वर्णनाच्या इसमाने बंगल्याच्या गॅलरीमध्ये प्रवेष करून बेडरूमला असलेल्या उघडया दरवाजावाटे बेडरूममध्ये प्रवेश करून बंगल्यातील पहिल्या मजल्यावरील दोन बेडरूममधील एकूण 92,000/- रू किंमतीचा माल चोरी करून पसार झाला.
चोरी गेलेला माल खालील प्रमाणे -1) 40,000/- एक अॅपल कंपनीचा लॅपटॉप मॉडल नं. एम 1 सिरीयल न SC 02GRBHNQ6L4,2) 5,000/- एक गेस कंपनीचे हातातील घडयाळ,3) 20,000/- रोख रक्कम त्यामध्ये 2000/- रू दराच्या तिन चलणी नोटा, 500/- रू दराच्या 28 चलणी नोटा,4) 10,000/- अॅपल कंपनीचे हेडफोन, 5) फिर्यादी यांच्या पत्नी दिपीका गुप्ता नावाचे ड्रायव्हींग लायसन्स,6) 10,000/- मित्र नेष्टर फेरो याचे हातातील सीटीजन कंपनीचे घडयाळ, 7) 5,000/- मित्र विवेक चतुर्वेदी यांचे अॅपल कंपनीचे एअरपॉड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, 8) 2000/- मित्र सेबीन सिमॉन याचे बीट कंपनीचे हेडफोन व आधारकार्ड असा एकूण 92 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. फिर्यादी यांच्या संमतीशीवाय मुद्दाम लबाडीच्या इरादयाने चोरी करून नेला आहे. वगैरे मजकुरावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. हवा उंडे हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page