Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळग्रामीण भागातील पर्यटन स्थळावरील निर्बंध रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा... ग्रामीण व्यवसाय...

ग्रामीण भागातील पर्यटन स्थळावरील निर्बंध रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा… ग्रामीण व्यवसाय संघटना मावळ !

ग्रामीण व्यवसाय संघटना मावळ यांच्यावतीने परिसरातील पर्यटन स्थळे व पर्यटकांवरचे निर्बंध रद्द करून फक्त पर्यटकांवर अवलंबून असलेले लहान मोठे उद्योग धंदे पूर्व स्वरूपात सुरु करण्यास सहकार्य करावे असे निवेदन मा. जिल्हाधिकारी पुणे यांना देण्यात आले आहे. आणि सदर निवेदनाची दखल जिल्हाधिकारी यांनी त्वरित घ्यावी त्यासंदर्भात ग्रामीण व्यवसाय संघटना मावळ च्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजित परिषदेमध्ये ग्रामीण भागातील पर्यटन स्थळे व पर्यटकांवरील निर्बंध लागल्याने भागातील लहान मोठे व्यावसायिकांची उपासमार होत असल्याचे मनोगत सर्व सदस्यांनी व्यक्त केले. तसेच गेली पाच महिने लॉक डाऊनमुळे उद्योग धंदे बंद असल्यामुळे आर्थिक तंगीचा त्रास सोसावा लागत आहे. त्यासाठी लहान उद्योग धंदे पूर्व स्तरावर सुरु होण्याकरिता हे व्यावसायिक शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायत मार्फत लावण्यात आलेल्या चेक पोस्ट गावाच्या व परिसराच्या हितार्थ असल्याची जाणीव असून सध्या स्थानिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हे चेक पोस्ट पर्यटकांसाठी खुले करावेत जेणेकरून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.

अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या व पर्यटकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करून व्यवसाय सुरु करू अशी ग्वाही सर्व सदस्यांकडून देण्यात आली आहे. जर ग्रामीण व्यवसाय संघटना आणि येथील लहान मोठया व्यावसायिकांकडून स्वतःच्या व पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत असतील तर शासनाने यांच्या निवेदनाकडे लक्ष घालून ताबडतोब तोडगा काढावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामीण व्यवसाय संघटना मावळच्या सर्व सदस्यांकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page